1 liner
1. ज्यांना रात्री केलेल्या कृत्याचा सकाळी उठल्यावर पश्चात्ताप होतो अश्या लोकांनी सरळ दुपारीच उठावे.
२. जाहिरातीवाचून धंदा करणे म्हणजे एखाद्या सुंदर स्त्रीने अंधारात डोळा मारण्यासारखे आहे.
३. माणसाने नेहेमी स्पष्ट बोलावे म्हणजे ऐकणाऱ्यालाही स्पष्ट ऐकू जाते.
४. मूलभूत राजकीय पक्ष दोनच- सत्ताधारी, सत्ताकांक्षी
५. दोन जोडपी समोरा समोर येतात तेंव्हा बायका एकमेकींच्या साड्या दागिने बघतात तर नवरे एकमेकांच्या बायकांकडे बघतात.
६. मुलगा आणि नारळ कसा निघेल हे आधीच सांगणे अवघड आहे.
७. प्रेम आंधळं असतं, लग्न डोळे उघडतं.
८. देवा मला वाट पाहायची शक्ती दे... तीही आज आता ताबडतोब!
९. काही माणसे जिवंत असतात कारण खून करणे बेकायदा आहे म्हणून!
१०. काळ हा सर्वोत्तम शिक्षक आहे, पण तो आपल्या सगळ्या शिष्यांचा बळी घेतो....
शब्दांमुळेच कधी-कधी एखाद्याचा होतो घात,
शब्दांमुळे मिळते एखाद्याची आयुष्यभर साथ.
शब्दांमुळे जुळतात मना-मनाच्या तारा,
शब्दांमुळेच चढतो एखाद्याचा पारा,
शब्दच जपुन ठेवतात त्या गोड आठवणी,
शब्दांमुळे तरळते कधीतरी डोळ्यात पाणी !
"अभिमानाला" कधी तुमच्या मनाच्या घरात येऊ देऊ नका
आणि "स्वाभिमानाला "कधी मनाच्या घरातून बाहेर काढू नका.
त्याचे कारण असे आहे,
अभिमान तुम्हाला कधीच प्रगती करू देणार नाही,
आणि स्वाभिमान तुम्हाला कधीच अधोगतिकडे जाऊ देणार नाही.
आपण कुणाची स्तुती कितीही करा
पण
अपमान खुप विचारपुर्वक
करा
कारण
अपमान हे असे कर्ज आहे
जे प्रत्येक जण
व्याजासह परत करण्याची संधी शोधत असतो........
आयुष्यात कधी वाईट वेळ आलीच नसती,
तर आपल्यात लपलेले परके आणि परक्यात लपलेले आपले कधी कळलेचनसते...
आपल्या माणसांसोबत वेळ नाही कळत,
पण वेळेसोबत आपली माणसं नक्कीच कळतात...
चुका दाखविताना त्या कमी कशा करायच्या हे ही सांगितले, तर त्याचा परिणाम चांगला होतो.
- बिल गेट्स