कधी असही जगाव लागतं....खोट्या हास्याच्या पडद्या आड खरे दुःख लपवाव लागतं....कर्तव्याच्या नावाखाली स्वतःला राबवाव....इतरांना आनंदी ठेवण्यासाठी डोळ्यातलं पाणी लपवाव लागतं....खुप इच्छा असुन देखील नाही म्हणाव लागतं....खुप प्रेम असुन देखील नाही अस दाखवाव लागतं.... अस इतरांना हसवता हसवता कधी खुप रडाव लागतं....
कधी कधी असही जगाव लागतं.
तू असतीस तर,
मला रडावं लागलं नसतं,
तू असतीस तर,
माझं घरटं तुटलं नसतं.....
तू असतीस तर,
माझं मन कासाविस झालं नसतं,
तू असतीस तर,
माझं हसू चोरी गेलं नसतं.....
तू असतीस तर,
माझं जग लुटलं नसतं,
तू असतीस तर,
माझं स्वप्न भंग पावलं नसतं.....
तू असतीस तर,
माझं ह्रदय तडकलं नसतं,
तू असतीस तर,
माझं दुःख चव्हाट्यावर मांडलं नसतं.....
तू असतीस तर,
माझं सुख हिरावलं नसतं,
तू असतीस तर,
माझं आयुष्य संपलं नसतं.....
तू कोणाच्या भरवश्या वर मला एकट :( सोडून गेलीस,
एव्हड्या भरलेल्या जगात पोरक करुण गेलीस,
इथ तर लोक फक्त मतलबा :( पुरत जवळ येतात,
या अश्या दुनियेत एकट :( सोडून गेलीस..
बायकोच्या आग्रहावरून लाडानं वाढवलेला
एकुलता एक मुलगा आपल्या बापाला वृद्धाश्रमात
सोडायला घेऊन जातो. हा अनाथश्रम कम वृद्धाश्रम
एक सेवाभावी वृद्ध मालक अनेक वर्षे चालवत असतो.
मुलगा तिथल्या सोयींबद्दल चौकशी करत असतो. सून तोपर्यंत सासर्याला सणावाराला सुद्धा घरी यायची काहीही गरज नाहीये, हे पटवून सांगत असते.
मुलगा वडिलांना विचारतो, "तुम्हाला एसी, टिव्ही असलेली रुम घेऊया का?"
वडील म्हणतात, "नको बेटा! काही गरज
नाही मला. साधीच रुम चालेल."
मुलगा फॉर्म भरण्यात
व्यग्र असतो. तोपर्यंत आश्रमाचा मालक आणि
वडिलांच्या जुन्या गप्पा चालू होतात. अगदी फार जुनी ओळख असल्यासारखे ते बोलत बसलेले असतात.
ते पाहून मुलगा विचारतो, "तुमची दोघांची आधीपासून
ओळख आहे का?" वडील काहीच बोलत नाहीत.
ते पाहून आश्रमाचे मालक म्हणतात, "हो रे.. आमची ३० वर्षे जुनी ओळख आहे."
मुलगा आश्चर्याने म्हणतो,
"कशी काय?"
आश्रमाचे मालक म्हणतात, "अरे, तीस
वर्षापूर्वी त्यांनी आमच्या इथूनच एक अनाथ मुलगा
दत्तक घेतला होता!!"
जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे,
आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम
करतो तिच्या शेजारी बसने...
आणि, ती व्यक्ती कधीही आपली होणार
नाही याची जाणीव होणे...
डोळ्यातून अश्रु ओघळला
की तोही आपला राहत नाही
वाईट याचंच वाटतं की
दु:ख त्याच्या सोबत वाहत नाही।