पावसाच्या थेंबात अश्रु लपवुन रडत असत
कोणीतरी..
कोणालातरी हसतांना लपुन बघत असत
कोणीतरी..
दिवे सगळे विझल्यावर का जळत असत
कोणीतरी..
सगळ जग झोपेत
असतांना उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघत
असत कोणीतरी..
कुणी येणार नाही तरी वाट बघत असत
कोणीतरी..
माणसांच्या या इतक्या गर्दीत का एकट
असत कोणीतरी.
पावसाचे आगमन झाले आणि आनंदाला उधाण आले.
आभाळातून पडणार्या प्रत्येक थेंबाला कडकडून मिठी मारावी आणि
" का रुसला होतास रे भावा! " असे विचारावेसे वाटते !
आज पाऊस पण
बेफाम कोसळत
होता. ..
.
आणि
मी पण भिजत
होतो मनसोक्तपणे
तिच्या आठवणीत....
मेघ गर्जतो...गर्जतो
काळजाचे होते पाणी...
अन डोळ्यांत अजुनही .....
तुझ्या ओठांतली गाणी
अबोल...पापण्यांनी
आसवांचा घात केला....
थेंब बोलके झाले नयनांना....
स्वप्नांचा भार झाला
मेघ होईल बोलका..
अन तुला कळेल सारं...
खोल मनांत दाबलेलं..
ओघळल्या थेंबासहीत...वेडे..
प्रेम माझे वाहीलेलं
तिला पाऊस आवडतो आणि मला पावसात
ती ...
तिला पाऊस आवडतो आणि मला पावसात
ती ...
तिला भिजायला आवडत मला भिजताना ति ..
तिला भिजायला आवडत मला भिजताना ति ...
तिला बोलायला आवडतं
आणि मला बोलताना ती ....
तिला बोलायला आवडतं
मला बोलताना ती ...
पण मला ती खुप आवडते
मला ती खुप खुप आवडते
पण तिला मी आवडत
नाही ....
कोसळणारा पाऊस पाहून,
मला नेहमीच एक प्रश्न पडतो,
माझे तर ठीक आहे,
पण हा कोणासाठी रडतो...