Mobile Sms, Status Updates and images. Hindi, Marathi, Punjabi and English messages.

Poem Marathi Status & Poem Marathi Sms


आपल्याला कोणी आवडणं
हे प्रत्येक वेळी च प्रेम नसतं
आकर्षणाचं स्वप्नं ते
आकर्षणंच असतं...

मान्य आहे,
आकर्षणात प्रेम केव्हा केव्हा दिसतं...
पण् जे चकाकतं
ते प्रत्येक् वेळीच् सोनं नसतं

मन् आपलं वेडं असतं
वेडं आपण व्हायचं नसतं..
मन मारुन जगण्यापेक्षा
वेळीच त्याला आवरायचं.

अशावेळी....
आणि अशाच वेळी आपल्या मनाला
आपणच आवरायचं असतं .

खरं प्रेम एकदाच होतं
ते कधीही विसरता येत नाही
शुद्ध, हळव्या भावनांचं आभाळ
अनेकांवर पसरता येत नाही....!!!!!!

Category : Poem


तुझी नी माझी भेट ती
क्षणो क्षणी का आठवे
आधी कधी ना वाटले
काही तरी होते नवे
सांगू कश्या मी तुला सख्या रे
माझ्या या भावना माझिया प्रियाला प्रीत कळेना..!

जागुन तारे मोजतो आहे
तुझ्यात मी ही रुजतो आहे
कधी तुला गं कळेल सारे
खेळ आहे जुना
माझिया प्रियाला प्रीत कळेना ..!

Category : Poem


एक प्रेयसी पाहिजे, पावसात चिंब भिजणारी;
अन मलाही तिच्यासोबत, भिजायला लावणारी.
एक प्रेयसी पाहिजे, फुलपाखरांमागे धावणारी;
फुलांचे सारे रंग उधळत, झाडांमागेलपणारी.
एक प्रेयसी पाहिजे, मुग्धपणे हसणारी;
माझ्या बाहूपाशात, अलगद येऊन बसणारी,
एक प्रेयसी पाहिजे, कशीही दिसणारी;
पण मनाने मात्र, अप्रतिम सुंदर असणारी.
एक प्रेयसी पाहिजे, जिवलग मैत्रीणअसणारी;
आमच्या नाजुक नात्याला, हळुवारपणे जपणारी.
एक प्रेयसी पाहिजे, माझ्या भावना जाणणारी;
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी. एक प्रेयसी पाहीजे, प्रेमाला प्रेम समजणारी;
सुखा-दुःखात माझ्या, तन्मयतेने साथ देणारी.

Category : Poem


खूप खूप वाटतं केव्हा तरी,
धावत तुझ्याजवळ जावं..
बाहुपाशात घेऊन तुला,
...
सारं जगं विसरावं..
गतकाळच्या आठवणींना,
पुन्हा एकदा जागवावं..
दु:ख सार सारून,
तुला डोळ्यांत साठवावं..
आयुष्याच्या संध्याकाळी,
बेधुंद होऊन जगावं..
उरलेल्या दिवसांसाठी,
सुःख जरा मागावं..
छेडून अंतरंगाची तार,
सुःखद स्वप्नांना जागवावं..

Category : Poem



प्रेम हे असच असत....
करताना ते कळत नसत आणि केल्यावर ते उमगत नसत...

उमगल तरी समजत नसत पण आपल वेड मन आपलच ऐकत नसत...
प्रेमाची भावनाच खूप सुंदर असते ती फक्त त्या दोन जीवांनाच माहित असते...

लोक म्हणतात काय असत प्रेमात.., करून बघा एकदा.., काय नसत प्रेमात...?

प्रेम हे सांगून होत नसत...,
मित्रानो ते झाल्यावरच कळत असत..

दोन जीवांना जोडणारा तो एक नाजूक धागा असतो...
दोन हृदयांची स्पंदने एकमेकांना ऐकवणारा एक भाव असतो...

प्रेमाची परिभाषाच खूप वेगळी असते...
दोन शब्दात ती कधीच समजत नसते ...

Category : Poem


जे तुला हि न कळले,
जे मला हि न कळले,
ते आपल्या नयनांना कळले...
अबोल प्रेम हे आपले,
आज सार्या जगाला कळले....
फुलणाऱ्या आपल्या प्रेमाला,
आज सार्या जगाने पाहिले...
अन कळत नकळतच,
आपल्या या मैत्रीच्या नात्याला,
प्रेमाचे नाव जुळले...
प्रेमाचे नाव जुळले...

Category : Poem

Marathi Sms & Status
Marathi Facebook Pics
  • Attitude
  • Boys
  • Facebook
  • Family Mother
  • Family - Father
  • Friends
  • Funny
  • Good-Morning
  • Good-Night
  • Joke
  • Life
  • Love
  • Me Marathi
  • Miss You
  • Motivational
  • Nice
  • Sad
  • Wise
FB Page