तुझ्या सुखावणा-या नजरेला...
लागू नये दृष्ट कोणाची कधीही...
नजरेलाही असतं सहृदयी मन...
दावून देते राहुनी अबोल प्रितीही...
कस असत ना आपण एखाद्या व्यक्तीवर
प्रेम
करतो तिच्या सहवासात
वावरतो त्या व्यक्ती सोबत
प्रत्येक क्षणाचा आनंद घेतो पण तीच
व्यक्ती जेव्हा आपणास सोडून जाते
आपल्या जीवनातून निघून जाते तेव्हा खुप
वाईट
वाटत...........
कारण आपल्याला त्या व्यक्ती ची सवय
झालेली असते तिच्या सहवासात
राहण्याची
आणि तीच व्यक्ति जेव्हा सोडून जाते
तेव्हा उरतो तो फ़क्त एकांत
आणि तिच्या आठवणीत
आपण खुप खुप रडतो
एकट्याची सुरुवात शेवटी एकटाच
प्रेमाची माझ्या वाट अतिशय खडतर हि..
दमलेत पाय माझ्या हृदयाचेही..
बोल ना..का म्हणालीस..,
"आहेत आपल्या वेगळ्या वाटा..??"
हाच तर रुतून बसलाय काटा..
जीवनाच्या वाटेवर चालताना मी जगेन अथवा मरेन, आयुष्याच्या शेवट पर्यंत मी तुझ्यावरच प्रेम करेन. याला म्हणतात जिवापाड एक लव स्टोरी.........!
जायचच होते निघून तर जाताना वळलास का?
जातानाही मग त्या वळनावर थांबलास का?
कधीच बोलला नाहीस तू
मी ही नाही बोलले
त्या मूक भावनेत शब्द आडवे नाही आले
अचानक असं नको ते बोललास का..
तुझ आसपास असणेही मला मोहरून टाकायच
हे फ़क्त मलाच नाही तुलाही समजायचे
इतके समजून ही तु अचानक गेलास का?
जातानाही मग त्या वळनावर
थांबलास का?
किंवा तुझे वागणे बोलणे पूर्णपणे normal असेल
मी काढलेला सोयीस्कर अर्थ असेल
तु वळावसे जाताना ही माझी आस असेल
आणि तुझे वळणावर थांबणे हा फ़क्त भास असेल..
मी नेहमीच तुझ्या बरोबर आहे
कधी तुझी सावली बनून
कधी तुझे हसू बनून
आणि कधी तुझा श्वास बनून..