Facebook status and images.Tag your facebook friends

Latest Marathi Status & Latest Marathi Sms


प्रत्येकाच्या जीवनात प्रेमाचं वादळ येत असतं.
कोणी भरकटत असतं,
तर कोणी टिकत असतं.
कोणी व्यक्त करत असतं,
तर कोणी लपवतं असतं.
प्रेम लपत नसतं तसचं दिसतही नसतं,
असं हे प्रेम असतं.

FB Share
Category : Loveमुलगा : तू उपाशीपोटी किती सफरचंद खाउ शकतेस ?
मुलगी : सहा
...
मुलगा : चुक..... फक्त १
कारण १ सफरचंद खाल्ल्यानंतर तू उपाशीपोटी नसते...
मुलगी : मस्त सूपर जोक आहे हा...

मग ती मुलगी आपल्या मैत्रिणी ला हा जोक
सांगायला जाते
सांग ग मयुरी तू उपाशीपोटी किती सफरचंद खाउ
शकतेस ?
मयुरी : नउ
मुलगी : तू ६ बोलली असतीस तर मी तुला एक मस्त जोक
सांगणार होते...

FB Share
Category : Jokeमित्र बोलतात मला,
आठऊ नकोस रे तिला,
तिला तू विसरण्याचा प्रयत्न कर...
ती नव्हतीच कधी तुझ्यासाठी,
हे आता, मानण्याचा तू प्रयत्न कर...
ती परत येणार नाही तुझ्या आयुष्यात,....
उठ आता,
अन पुढे चालण्याचा तू प्रयत्न कर...
सिगरेटच्या धुरात शोधणं, सोडून दे रे तिला,
ती गेली हे मानून,
आता तरी तू जगण्याचा प्रयत्न कर...
रडणं सोड रे तिझ्यासाठी तू आता,
उघड्या डोळ्याने, या दुनिये कडे पाहा ,
ह्या सुंदर दुनिये कडे पाहता पाहता,
आता तरी तू हसण्याचा प्रयत्न कर...
आता तरी तू हसण्याचा प्रयत्न कर.

FB Share
Category : Broken-Heartआईस लिहिलेले पत्र :-

प्रिय आईस,

पत्ता :- देवाचे घर....

तुझा हात हवा होता सदा माझ्या उश्यावर,
थापटून मला झोपवायला, अचानक जाग आल्यावर.

मी अजून सुद्धा दचकून जागा होतो मधीच,
तुझी काळजी रात्रभर सतावत राहते उगीच.

तू का इतक्या लवकर सोडून गेलीस गाव माझं,
'आईविना पोर'असं घेतात लोक नाव माझं.

वरवरच्या पदार्थाची मला चवंच लागत नाही,
काय करू, तुझ्या दुधाविना माझी भूकच भागत नाही.

पोरकेपणाचा माझ्याभोवती का ठेऊन गेलीस जाळ,
का खरंच इतकी कच्ची होती तुझ्या माझ्यातली नाळ.

तिथं कुणी आहे का तुझ्याशी बोलायला भरपूर,
उगाच रडत राहू नकोस दाबून स्वतःचा ऊर.

बघं आता आई मी रडत नाही पडलो तरी,
मला ठाऊक आहे तू गेली आहेस देवा घरी.

भूक लागली तरी बिलकुल मी रडत नाही,
कारण मी हसल्याशिवाय तुला चैन पडत नाही.

पण रोज रात्र झाली की तुझ्या आठवणींचा थवा येतो,
अंथरुणात लपून, पुसून डोळे मी गप्प झोपी जातो.

बघं तुझं बाळ किती समजूतदार झालं आहे,
आणि वय कळण्याआधी वेडं वयात आलं आहे.

अजिबात म्हणजे अजिबात त्रास देत नाही पप्पाला,
तुझी काळजी तेवढी मात्र घ्यायला सांग देवबाप्पाला.

आणि सांग की हे शहाणं बाळही आहे जरा हट्टी,
जर का काही झालं तुला तर घेईन म्हणावं कट्टी.

मी आता थकलोय तुला ढगांमध्ये पाहून,
ये आता भेटायला नजर तिथली चुकवून.

जमलं जर का सुट्टी घ्यायला तर ये निघून अशीच,
पोट भरतं गं रोज पण मायेची भूक अजून तशीच...

-तुझाच लाडका.

FB Share
Category : Motherमराठी मुलगी कशी ओळखल ???

१) ओढणी (पदर) चुकून
थोडीशी जरी काही पडली तरी विजेच्या वेगाने
लगेच सावरणारी !!!

२) पुण्याच्या गर्दीने भरलेया बसमध्ये सुद्धा,
किवा मुंबईच्या गर्दीतसुद्धा आपले सत्व
सांभाळणारी!!!

३) मुलगा कितीही आवडला तरी , भावना वक्त न
करणारी !!!

४) कॉर्पोरेट ऑफिस मध्ये
कामाला असलीतरी छोटस का होयिना मंगलसूत्र
घालणारी !!!

५) कितीही मोठ्या हुद्यावर
कामाला असली तरी आपले आई वडील , सासू
सासरे,नवरा , भाऊ यांना मान देणारी !!!

६) समाज्यात वावरताना सगळ्यांना भाऊ,
दादा म्हणून हक मारणारी !!!
लिहिण्या सारखं भरपूर आहे ...

FB Share
Category : Me-Marathiमुलीँचे हसणे हे मुलाच्या हसण्यापेक्षा ही,
खुप सुंदर आणि लुभावने असते..
पण ...
मुलांचे प्रेम हे
मुलींच्या प्रेमापेक्षा ही,
खुप भावनिक आणि अर्थपुर्ण असते...!!!

FB Share


  Previous  1 2 3 4 5  Next