कटू पण सत्य...
..
..
..
..
..
..
..
..
..
पैसे घेऊन स्वत:ला विकणारी बाई आणि पैसे घेऊन मत देणारी जनता यात आता काहीही फरक उरला नाही..
जग एक सापशिडीचा खेळ आहे ,इथ शिड्या कमी अन गिळणारे सापच जास्त आहेत.
वाघाशी वैर
करण्यासाठी नुसती वाघांशी मैत्री करुन चालत
नाही तर स्वताला वाघ बनाव लागत...
"आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःच्या कृत्याबाबत स्पष्टीकरण देऊ नका.
कारण, ज्यांना तुम्ही आवडता त्यांना याची आवश्यकता नसते.
अन् ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधी विश्वास ठेवायला तयार होत नाहीत...!"
गरीब माणुस दारु पितो, मध्यमवर्गीय मद्यपान करतो, तर श्रीमंत लोक ड्रिंक्स घेतात!
काम केल्यावर गरीब माणसाला मजुरी मिळते, काम केल्यावर मध्यमवर्गीय गृहस्थाला पगार मिळतो, तर काम केल्यावर ऑफिसर लोकांना सॅलरी मिळते!
गरीब माणुस करतो ते लफडं, मध्यमवर्गी य माणुस करतो ते प्रेम, तर श्रीमंत व्यक्ती करतात ते अफेअर!
शब्दाने शब्द वाढला की कविता होते, शब्दाने शब्द वाढला की भांडण होते शब्दाने शब्द वाढला की लेखकाची रॉयल्टी वाढते
शिक्षणापेक्षा,
अनुभव हा मोठा असतो,
म्हणूनच अनुभवी माणसापेक्षा,
शिकलेला माणूस हा छोटा असतो...