तुला पाहताना फक्त
पाहतच राहावस वाटत...
तुझ्या डोळ्यात स्वतःला सामावुन घ्यावावसे वाटते..
खरच..किती सुंदर कल्पना असते ना प्रेमाची..
ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच्यासाठीच आयुष्य
जगावेसे वाटते..
आणि
त्याच्याच मिठीत
आयुष्य सरावेसे वाटते..
आज पाऊस पण
बेफाम कोसळत
होता. ..
.
आणि
मी पण भिजत
होतो मनसोक्तपणे
तिच्या आठवणीत....
'प्रेम' हा काही प्रायोजित कार्यक्रम नही की, इच्छेनुसार केले अथवा इच्छा नसली म्हणजे थांबविला. 'प्रेम' मानवी भावना आहे. तिच्यावर कोणाचेही 'राज' चालत नाही. 'प्रेम' हे 'स्टॉप वॉच' तर मुळीच नाही. म्हणजे मर्जी असली की सुरू केलं व मर्जी नसली की बंद. 'प्रेम' तर अमृताचा झरा आहे. तो निरंतर सुरूच रहाणार आहे.
काट्यांसकट गुलाब
याचसाठी विकत घेतात
कारण हास्य व अश्रूं
प्रेमात एकत्र येतात..!!
प्रेम म्हणजे गवताचं
एक नाजूक पातं असतं
हृदयाला हृदयाशी जोडणारं
एक पवित्र नातं असतं !!!!!
माहित नाही
तू जवळ असल्याचा इतका भास का होतो
जेव्हा माझे हृदयाचे ठोके वाढतात
तेव्हा बोलत असतात तुझे ओंठ शांतपणे
जेव्हा थंड हवेत पण श्वासाची गरम झळ येते
तेव्ह तुझे डोळे साद घालत असतात निवांतपणे
जेव्हा तुझा चेहरा अभिप्राय घेवून येतो
तेव्हा तुझें चित्र डोळ्यात पोहत असतात
जेव्हा तो निष्पाप प्रश्न घेवून येतो
तेव्हा मला भिंतीवरचे आरसे सुधा बघत असतात
तुला कोणताच वचन दिला नाही मी
मग मी तुझी वाट का पाहत असतो
अनावश्यकपणे संमती मिळाल्यावर
हा हृदय खूप अस्वस्थ का असतो
माहित नाही
तू जवळ असल्याचा इतका भास का होतो