निर्सगाला रंग हवा असतो.
फुलांना गंध हवा असतो.
माणुस हा एकटा कसा राहणार, कारण.......
त्यालाही मैञीचा छंद हवा असतो.....
काटयांवर चालून दुसऱ्यासाठी रचलेली फुलाची रास म्हणजे मैत्री.
तिखट लागल्यावर घेतलेला पहिला गोड घास म्हणजे मैत्री.
एकटे असल्यावर झालेला खराखूरा भास म्हणजे मैञी. मरताना घेतलेला शेवटचा श्वास म्हणजे मैत्री. :) s
आयुष्य म्हणजे...
एक संध्याकाळ, चार मित्र, चार कप चहा, आणि एक टेबल...
आयुष्य म्हणजे...
चार गाड्या, दहा मित्र, सुट्टे पैसे आणि एक मोकळा रस्ता...
आयुष्य म्हणजे...
एका मित्राचे घर, हलका पाऊस आणि गप्पा...
आयुष्य म्हणजे...
कॉलेज चे मित्र, बंक केलेले लेक्चर, तीन्घांत एक वडापाव आणि बिलावरून भांडण...
आयुष्य म्हणजे...
फोन उचलल्यावर मित्राची शिवी आणि sorry बोलल्यावर आणखीन एक शिवी...
आयुष्य म्हणजे...
तीन वर्षा नंतर अचानक जुन्या मित्राचा एक SMS , धुळीत पडलेला फोटो आणि डोळ्यात आलेले अश्रू...!!! :')
मैत्री..............
नको फुलासारखी,शंभर सुगंध देणारी..
नको सूर्यासारखी ,सतत तापलेली...
नको चंद्रासारखी,दिवसा साथ न देणारी....
नको सावली सारखी,कायम पाठलाग करणारी....
मैत्री.......
हवी अश्रुसारखी ,सुख दुखात समान साथ देणारी......
चांगले मिञ या जगात सहजासहजी मिळत नाहित
जवळ असताना माञ एकमेकाशि पटत नाहि..
कळत असत सार काहि पण एक माञ वळत नाहि
काय असते हि मैञी? ते मिञांपासुन दुर गेल्याशिवाय कळत नाहि..
समुद्राच्या पाण्याला ओढ होती किनार्याची
चंद्राला ओढ होती चांदण्याची
आकाशाला ओढ होती धरणीची
मेत्री ला ओढ होती प्रेमाची
याला जोड असते अनमोल अश्या विश्वासाच्या नात्याची