आयुष्य हा जुगार आहे
दुखः ही त्यातली हार आहे
सुख ही त्या जुगारातली जीत आहे
ती हवी तर सार्या सार्या जगाला
ओरडून, गाजावाजा करुन सांगावी
माणासानं सुख वाटुन घ्यावं
पण दुखः मात्र एकट्यानेचं सोसावं...... !
त्याचं प्रदर्शन का करावं ????
अपयशास चाखल्याशिवाय यशाला किंमत येत नाही
पैलूंना पाडल्याशिवाय दगडाचा हिरा होत नाही
नुसती हळद पिल्याने गोरे होता येत नाही
टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही
रांजणात गोटे टाकल्याशिवाय कावळ्याची तहान भागत नाही
हातपाय हलवल्याशिवाय अंगण सरळ होत नाही
दे रे हरी पलंगावरी हरी नाही देत नाही
टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही
आळशीपणामुळे सशाला शर्यत जिंकता येत नाही
मूर्ती कितीही मोठी तरी कीर्ती सहज येत नाही
प्रयत्नच केल्याशिवाय कविता लिहिता येत नाही
टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही
"आयुष्यात प्रत्तेक चुकीला माफी मिळेलच असे नाही.....!!
काय लागतं नक्की कुणीतरी आपल्या मनाच्या जवळ यायला....????
तसं समोरची व्यक्ती दिसायला सुंदर असलं कि....,
लक्ष पटकन जाते आणि आवडायची क्रिया पण पटकन सुरु होते हे मान्य आहे.....
पण कधी कधी समोरची व्यक्तीला न पाहता पण ती व्यक्ती तुमच्या मनात घर करून जाते.....
मनात घर करायला फक्त तश्या प्रसंगाची गरज असते....,
समोरची व्यक्ती कधी कधी आपण ज्या मनस्थितीतून जात आहोत... त्या परिस्थितीत आपल्याशी कशी वागतेय ह्यातून आपल्या पासूनचे अंतर कमी जास्त करते.....
कधीतरी स्वतःच्याच माणसांकडून दुखावलेलं " एकटं मन " तुम्हाला कुठे भरकट घेऊन जाईल काही सांगता येत नाही..... याच काळात स्वतःला सावरले तर ठीक नाही तर आयुष्याच्या बऱ्याच चुका ह्या एकटेपणात होतात.....
ठराविक वेळेत मिळालेले " जिव्हाळ्याचे दोन शब्द " पण एखाद्या व्यक्तीला तुमच्या जवळ आणू शकतात.... ते " जिव्हाळ्याचे दोन शब्द " आपल्यालाआपलं माणूस विसरायला लावून नवीन अनोळख्या व्यक्तीकडे ओढत नेतं.....
" परिस्थिती आपली मनस्थिती ठरवते आणि आपली मनस्थिती आपली कृती ठरवते......"
म्हणून एकटेपणात स्वतःला जरा सावरायचं..,
मनाला जरा थोडंसं आवरायचं..,
शांत करायचं थोडं मन...,
अन मग काय ते ठरवायचं..
कारण
" आयुष्यात प्रत्तेक चुकीला माफी मिळेलच असे नाही....!!"
आजच्या समाज्यातील एक कटू सत्य..
..
..
..
..
..
..
ज्या वयात मुलांना
शिवाजी महाराजांनी स्वराज्य का निर्माण केले?
भगतसिंग-राजगुरू कुणासाठी फासावर गेले?
इतिहास, संस्कृती, भाषा म्हणजे काय?
हे शिकवायचं असतं त्या वयात त्यांना..
'जॉनी जॉनी एस पप्पा ..'
'ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार..'
'बेबी बेबी बेबी...ओ ओ..'
हे शिकवलं जातं..
म्हणून तर राजा, कलमाडी सारखी बियाणं तयार होतात
आणि अशीच लोकं त्यांच्या कृत्याकडं पाहत बसतात.
आयुष्यात प्रेम कारा; पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका. "
माफी मागून झालेली चूक सुधारू शकतो,
पण..?????
माफी मागून तुटलेला विश्वास कधीही मिळत
नाही..
म्हणून आयुष्यात चुका करा,
पण..?????
कुणाचा विश्वास कधीही तोडू नका..