आठवण असते ती साठवण्यासाठी
कधी दुखावते तर कधी सुखावते
तरीही कायम स्मरणात राहते
कधी काट्यांनी बोचते
तर कधी फुलांनी फुलवते
कधी येते रडवण्यासाठी
कधी येते हसवण्यासाठी
आठवण असते एक किंवा असतात अनेक....!
संकटकाळी धावून येतो तोच खरा मित्र''-
''जीवनाच्या पाककृतीतील सर्वात महत्वाचा घटक म्हणजेच मित्र''
मैत्री म्हणजे शब्दांशिवाय एकमेकांचं मन जाणून घेणं,चुकलं तर ओरडणं,कौतुकाची थाप देणं,एकमेकांचा आधार बनणं,मैत्री म्हणजे अतूट विश्वास,मैत्री म्हणजे आयुष्याचा प्रवास सुसह्य करणारी हिरवीगार पाऊलवाट.
सुकलेले फुल सुगंध देऊन जातात,
गेलेले क्षण आठवणी देऊन जातात,
प्रत्येकाशी ओळख असतेच निराळी,
कोणी मैत्रीत प्रेम तर,
कोणी प्रेमात मैत्री देऊन जातात.
चांगले मिञ या जगात सहजासहजी मिळत नाहित
जवळ असताना माञ एकमेकाशि पटत नाहि..
कळत असत सार काहि पण एक माञ वळत नाहि
काय असते हि मैञी? ते मिञांपासुन दुर गेल्याशिवाय कळत नाहि..
मैञी म्हणजे, माणुसकीच्या गावात जाणारी पायवाट
भिजून चिँब करणारी समुद्राची उसळती लाट
मैञी म्हणजे , वादळात दिव्याभोवती पसरणारे हात
संकटकाळात खांद्यावर हात ठेवणारी अलगद साथ
मैञी म्हणजे , स्वप्नभंग न पावणारी चंदेरी रात
बालपणी जमवलेल्या आठवणींची तुफान बरसात......!!!
"मैत्री"म्हणजे
'संकटाशी' झुंजणारा 'वारा' असतो.
'विश्वासाने' वाहणारा आपुलकीचा 'झरा' असतो.
"मैत्री" असा खेळ आहे
दोघांनीही खेळायचा असतो.
एक 'बाद' झाला तरी
दुसर्याने 'डाव' 'सांभाळायचा' असतो...