मैत्री कधी संपत नाही
नाते कधी तुटत नाही
उलटत असली जरी माणसे
शब्द मात्र कधीच साथ सोडत नाही..
काहि नाती बनत नसतात....
ति आपोआप गुंफली जातात...
मनाच्या ईवल्याशा कोपऱ्यात काहि जण हक्काने राज्य करतात....
त्यालाच तर "मैत्री" म्हणतात...
मैञीला नसतात शब्दांची बंधने..,
त्याला असतात ती फक्तहदयाची स्पंदने..,
मैञी व्यक्त करण्यासाठी कधी कधी शब्द अपुरे पडतात..,
पण अंतःकरणापासुन व्यक्त केले तर चेहरावरील भावही पुरेसे असतात...!!
मैत्री असावी चंदनासारखी,
सुगंध देणाऱ्या फुलासारखी,
जशी तुटलेल्या ताऱ्याला आधार देणाऱ्या धरतीसारखी,
प्रकाशाचे तेज घेऊन सावलीसारखी कोमल असावी.
मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फ़ायदा आहे.
मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फ़ायदा आहे,
मैत्रीला कुठले नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे....
मैत्रीची वाट आहे कठिण पण तितकीच छान आहे,
आयुष्याच्या कुडीचा मैत्रीच तर प्राण आहे....
मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट,
ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट....
तुझी-माझी मैत्री म्हण्जे आयुष्याचा ठेवा,
मुखवट्यांच्या गर्दीमधला खात्रीचा विसावा ..
चांगले मित्र ,
हाथ आणि डोळे प्रमाणे असतात
जेह्वा हाताना यातना होतात
तेह्वा डोळे रडतात आणि जेह्वा
डोळे रडतात तेह्वा हाथ अश्रू पुसतात !!