आपल्या पडत्या काळात , आपले दिवस वाईट असताना
परिस्थीती आपल्या विरुध्द असताना ,
आपणास गरज असताना , आपण एकाकी असताना
शक्य असूनही ज्या व्यक्ती आपली साथ नाही देत ......
त्या व्यक्तींना आपल्या चांगल्या काळात , आनंदाच्या क्षणात
सहभागी होण्याचा अजिबात अधिकार नसतो.........
काट्यांसकट गुलाब
याचसाठी विकत घेतात
कारण हास्य व अश्रूं
प्रेमात एकत्र येतात....
व्यक्तीवर प्रेम करावे आणि वस्तूंचा वापर करावा
असे सारे सांगतात पण...
जागात असे दिसते बर्याचं वेळा ....
वस्तूवरच्या प्रेमापायी व्यक्ती वापरल्या जातात..
नाणे पडते तेव्हा त्याचा आवाज होतो .....
पण नोट पडते तेव्हा आवज होत नाही .......
शांत आणि संयमाने हाताळा प्रत्येक गोष्ट
स्वतःचे मुल्य जाणा .....
नातं कोणतेही असू द्या..एकदा का नात्यांमधला विश्वास उडाला कि आयुष्य रंग उडालेल्या भिंतीसारखं बेरंग बनत...भिंतीना रंग परत देता येतो पण बेरंग आयुष्यात रंग भरणं खुप कठिण होउन बसतं...आणि म्हणूनच नात्यात महत्वाचा असतो तो म्हणजे " एकमेकावरचा विश्वास "... त्या विश्वासाला तडा जाईल असे कधी हि वागू नका....!!
गरीब माणुस दारु पितो,
मध्यमवर्गीय मद्यपान करतो,
तर श्रीमंत लोक ड्रिंक्स घेतात!
काम केल्यावर गरीब माणसाला मजुरी मिळते,
काम केल्यावर मध्यमवर्गीय गृहस्थाला पगार मिळतो,
तर काम केल्यावर ऑफिसर लोकांना सॅलरी मिळते!
गरीब माणुस करतो ते लफडं,
मध्यमवर्गी य माणुस करतो ते प्रेम,
तर श्रीमंत व्यक्ती करतात ते अफेअर!
शब्दाने शब्द वाढला की कविता होते,
शब्दाने शब्द वाढला की भांडण होते
शब्दाने शब्द वाढला की लेखकाची रॉयल्टी वाढते…