लोकं ही कधी कधी
फुग्या प्रमाणे वागतात
थोडी फुंकर काय मारली
लगेचं फूगून जातात
थोड्याश्या हवेनेचं
खुप फुलून वर येतात
स्वतःला मोठे इतरांना
तुच्छ समजतात
उडता काय यायला लागते
जमीनीला विसरुन जातात
स्वतःच्या मर्यादा न जाणता
बेलगाम भरकटतात..
वास्तवतेच्या सुईला भिडताचं
भ्रमाचे फुगे फुटतात
सारी हवा निघून जाते
पुन्हा जमीनीवरचं येतात...
आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःच्या कृत्याबाबत स्पष्टीकरण देऊ नका......
कारण....ज्यांना तुम्ही आवडता.....
... त्यांना त्याची कधीच आवश्यकता नसते....!!
अन् ज्यांना तुम्ही आवडत नाही ....
ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होणार नाहीत...!!
आपल्यला अनपेक्षित रित्या कधी सुवर्णसंधी मिळते याची वाट पाहता .., हाती आलेली साधी संधी दवडू नका....कारण कोणतीही विद्या, ज्ञान , संधी, कधीच वाया जात नाही...!!
" वेळ बदलते ..... आयुष्य पुढे सरकल्यावर ...
आयुष्य बदलते .... प्रेम झाल्यावर ...
प्रेम नाही बदलत .....आपल्या लोकांबरोबर ...
पण ...आपली लोक मात्र बदलतात ..... वेळ आल्यावर ....!!! "
किती फरक पडतो ना माणसात..
लहानपणी खेळणी तुटल्यावर रडणारे पोर...
मोठेपणी स्वप्न तुटल्यावर सुद्धा.. हसत हसत वावरतं......!!! !!
आपल्यला अनपेक्षित रित्या कधी सुवर्णसंधी मिळते याची वाट पाहता .., हाती आलेली साधी संधी दवडू नका....कारण कोणतीही विद्या, ज्ञान , संधी, कधीच वाया जात नाही...!!