माणसाचे आयुष्य फक्त दोनवेळा बदलते...
१. जेव्हा कुणीतरी खास व्यक्ती तुमच्या आयुष्यात येते
२. जेव्हा ती खास व्यक्ती तुमच्या आयुष्यातून निघून जाते...
जीवन फक्त जगायचे असते ....
त्यातून कही तरी शिकायचे असते....
शिकता शिकता इतराना ही मदत करायची असते....
जीवन जगताना आठवणी चा आधार घ्यायचा असतो ....
त्यातूनच अनुभव घडवायच असतो ...
जीवन म्हणजे उन सावली चा खेळ असतो...
आज बालपण तर उद्या तारुण्य अणि परवा म्हातारपण ...
असे हे जीवन चालतच राहते, ते न थांबते ना थांबवते..
जीवन हे असेच सुख: दुख: च्या काटेरी फुलात गुंतलेले असते ....
त्यातूनच मार्ग काढत जगायचे असते ....
जीवनात प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीला दोन बाजु असतात,
अनेक चढ़ उतार असतात.., अनेक मार्ग सुद्धा असतात.......
यातूनच योग्य मार्ग काढून जगणे हेच खरे जीवन असते ...
म्हणूनच जीवन फक्त हसत खेळत जगायचे असते....!!
आयुष्य म्हणजे...
एक संध्याकाळ, चार मित्र, चार कप चहा, आणि एक टेबल...
आयुष्य म्हणजे...
चार गाड्या, दहा मित्र, सुट्टे पैसे आणि एक मोकळा रस्ता...
आयुष्य म्हणजे...
एका मित्राचे घर, हलका पाऊस आणि गप्पा...
आयुष्य म्हणजे...
कॉलेज चे मित्र, बंक केलेले लेक्चर, तीन्घांत एक वडापाव आणि बिलावरून भांडण...
आयुष्य म्हणजे...
फोन उचलल्यावर मित्राची शिवी आणि sorry बोलल्यावर आणखीन एक शिवी...
आयुष्य म्हणजे...
तीन वर्षा नंतर अचानक जुन्या मित्राचा एक SMS , धुळीत पडलेला फोटो आणि डोळ्यात आलेले अश्रू...!!! :')
जीवन सुंदर व यशस्वी होण्यासाठी तीन गुणांची जरुरी असते.
पहिला गुण म्हणजे मनात सर्वांविषयी प्रेम पाहिजे. दुसरा गुण
म्हणजे ज्ञान पाहिजे आणि तिसरा गुण म्हणजे काम
करण्यासाठी शक्ती पाहिजे विचार ही एक विलक्षण शक्ति असून,
तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे,...म्हणून
विचार बदला,..म्हणजे नशीब बदलेल...
कधी प्रश्नात उत्तरं मिळतील
कधी उत्तरात प्रश्न सापडेल
काय सोडवलं काय आणि सोडलं काय
त्याचं उत्तर ही एक प्रश्नचं असेल....
जिवनात काही प्रत्येक प्रश्नांना
कधीचं ठाम अशी उत्तरे नसतात
आणि कदाचित उत्तर मिळाले
तर मात्र तेव्हा प्रश्नचं बदलतात .....
'जीवन एक त्रिकोण आहे .त्याच्या तीनही बाजू -
शरीर ,मन ,आणि बुद्धी -सारख्या लांबीच्या असण्याने
ते संतुलित होते.कोणतीही एक बाजू जास्त खेचली
कि दुसरी बाजूहि लांब होते व तिसरी बाजू फार लहान
होते .भावना प्रधान प्रश्न सोडवताना कोरड्या बुध्द्धीला
आवर घालावा लागतो, बुद्धीनिष्ठ प्रश्न सोडवताना
भावनेला (आवेशालां)आवर घालावा लागतो आणि या
ओढातानीत शारीराचीही अबाल व्हायला नको .हे
संतुलन जीवनातील सर्वात कठीण गोष्ट आहे. ते निर्दोष
होणे बहुतांशी अशक्य होते आणि जीवन एक द्वंद्व
म्हणून जगावे लागते .'