आपला कोणी प्रियकर अथवा प्रेयसी असणे
म्हणजेच प्रेम नसते
रोज रोज "आय लव्ह यु" म्हणणे
म्हणजेच प्रेम नसते
तर आपल्या आयुष्यात कोणी तरी अशी व्यक्ती असणे
ज्याच्यावर / जिच्यावर आपला इतका विश्वास असणे
कि तुम्ही त्यांना किती हि दूर केलेत..त्यांचे मन किती हि दुखावलेत...
तरी देखील ते तुमची साथ सोडणार नाहीत...
ते केवळ "तुमचेच होते.. तुमचेच आहेत.... आणि तुमचेच राहतील...."
हाच एक विश्वास ज्या व्यक्ती बद्दल वाटतो तेच आहेत तुमचे "खरे सोबती...."
हेच खरे प्रेम आहे...
हाच खरा विश्वास आहे ...आणि हेच जीवन आहे..
वस्तू चोरणे सोपे आहे
ते तर कोणालाही जमते;
मन चोरणे कठीण आहे
ते मोजक्यांनाच जमते...
एखादी व्यक्ती आवडणे
हे नैसर्गिक आहे...
तीच्यावर प्रेम करणे हा गुणधर्मच आहे...
पण समोरच्या व्यक्तीच्या मनातल न जाणता न समजता प्रेम करत राहाणे..
हा मुर्ख पणा आहे का..?
कारण प्रेम हे होते पण कोणाला करण्यास भाग पाडता येत नाही..
म्हणुन जर एखादी व्यक्ती मनात घर करुन गेली
तर त्याच वेळी खाञी करुन घ्यावी..
नाहीतर आयुष्यभर विरहाचे जिवण जगण्यास
खंबीर राहावे