जगाच्या दूर ,
एका प्रेम नगरीत ,
आपल छोट स एक घर
असाव ,
अस माझ प्रेम असाव ...
... तू माझी रोज वाट पहावी ,
आणि मी हळूच येवून ,
तुला मिठीत घ्याव ,
अस माझ प्रेम असाव ...
मी उशिरा का आलो म्हणून
रुसाव , मी मग तास न तास
तुला मनावाव,
आणि मग हळूच तू हसून
द्याव ,
अस माझ प्रेम असाव ...
जेव्हा तुम्ही अगदी मनापासून एखाद्यावर प्रेम करता तेव्हा त्यांच्या चुका, त्यांनी तुमच्याकडे केलेलं दुर्लक्ष ह्यामुळे तुम्हाला राग येत नाही ...............कारण ते आपलं मन असत ज्याला राग येतो, पण तिथे आपलं हृदय पण असत जे आपल्या रागावर ताबा मिळवते आणि पुन्हा प्रेम करायला लागते .....
जेव्हा तुम्ही प्रेम करता, .... तेव्हा तुम्ही दुखावले जाता
जेव्हा तुम्ही दुखावले जाता, .... तेव्हा तुम्ही द्वेष करता
जेव्हा तुम्ही द्वेष करता, .... तेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता
जेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता, .... तेव्हा तुम्ही मिस करायला लागता
आणि जेव्हा तुम्ही मिस करायला लागता, .... तेव्हा तुम्ही पुन्हा प्रेम करू लागता
खुप प्रेम करते रे
तुझ्यावर
तुला समजावु तरी कसे
मन मारावे तु माझ्यासाठी
कधीच अशी माझी अपेक्षा नसे
... असा काही ये जिवनात माझ्या
की आपला एकच जीव होईल
स्वर्ग नको फक्त तु ये
स्वर्ग आपोआप तयार होईल....
खरं प्रेम एकदाच होतं
प्रेम करणं काही गुन्हा नाही
पण म्हणतात,
खरं प्रेम एकदाच होतं
पुन्हा पुन्हा नाही..
...स्वत:चं आयुष्य झोकुन द्यायचं
स्वत:चं अस्तित्व विसरून जायचं
प्रेमात पडल्यानंतर सारंच जगणं
रोजचच आयुष्य नव्याने जगायचं
रोजच खेळ नवा मनाचा,
होत ही तो जुना नाही
पण, खरं प्रेम एकदाच होतं
पुन्हा पुन्हा नाही..
एखादी गोष्ट जर आपल्याला बघायची नसेल तर आपण डोळे बंद करून घेऊ शकतो ...
पण भावनांच काय हो ? त्या तर जाणवतातच ना, .... त्यासाठी आपण आपले हृदय तर बंद करू शकत नाही !!