बहुतेक तुला रडवणारे तुझ्या अश्रूंचे चाहते असतील
जिवंत झरे त्यांच्या हॄदयात प्रेमाचे वाहते असतील
कुणाचेच नसतात हक्क कुणावर पण... तरीही डोळे भरतातच ना ?
मुळात अपेक्षाच करु नये अशा पण.... तरीही आस लागतेच ना ?
हिशोब मांडायचा सारा तर आकडे पडतील कमी....,
तरीही सुख मोजताना पापण्या भिजतातच ना...???
लाख झाला असेल मनाचा दगड....,
तरीही आठवणींनी त्याला पाझर फुटतोच ना....??
जोडलेली नाती तुटताना मनात वेदना होतातच ना ...??
या सगळ्यातनं हाती उरायचे असते शून्य...फक्त एक शून्य..
पण..... तरीही जीव जडतातच ना .....?
लोक म्हणतात की," एक जन गेल्याने दुनिया संम्पत नाही किंवा थांबत नाही पण हे कोणालाच कसे कळत नाही, की लाखो लोग मिळाले तरी त्या एकाची कमी पूर्ण होत नाही"
रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात
कारण शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते,
पण अश्रू ला बाहेर येण्यासाठी मनाला जखमी व्हावे लागते...
कोसळणारा पाऊस पाहून,
मला नेहमीच एक प्रश्न पडतो,
माझे तर ठीक आहे,
पण हा कोणासाठी रडतो...
असे नको ग ...
रुसू सखे माझ्यावरी,
चुकून डोळा लागला ..
बोलत असता कुशीवरी.
बोल ना ग आता...
झोप गेली लांब तीरावरी,
बोलली नाहीस की ...
नाही करमत मझला तुझ्यापरी..