आयुष्यात एक तरी जोडीदार असावा...
प्रेमाला प्रेम समजणारा ..
जिवाला जिव लावणारा...
जीवनाच्या वाटेवर सुख आणि दुखात साथ देणारा.....
आयुष्यात एक तरी जोडीदार असावा...
आपल्यावर खूप खूप प्रेम करणारा....
पहिल्या प्रेमाची रीतच न्यारी,
आयुष्यभर न सरणारी;
रुसवे- फुगवे,हट्ट, भांडणानाही लाडिक म्हणणारी;
प्रेमाने आतून ओथंबून वाहणारी,
अन ओठावर आल्यावर मुके
करणारी;पहिल्या प्रेमाची रीतच न्यारी,
तुटके हृदय अन पोखरलेल्या
मनास, आठवणींच्या बळावर सावरणारी;
आयुष्यभर न सरणारी..!!!!
तुला चोरून बघताना मला खुप बर वाटतं,
तुझ्या मागुन फिरताना तुझ्या सोबत फिरावसं वाटतं . ..
.
तुझ ते निरागस हास्य निहारून पहावसं वाटतं,
हातात हात घालून तुझ्या सोबत चालावसं वाटतं . ..
.
तुझ्या त्या लाजन्या कड़े एकटक पहावसं वाटतं,
तुझ्या समोर उभा राहून तुझा चेहरा मनात भरावसं वाटतं ...
.
मला खुप खुप खुप तुझ्या सोबत बोलावसं वाटतं
तुझ्यावर जिवापार प्रेम करावसं वाटतं . . .
खरच तुझ्यावर जिवापार प्रेम करावसं वाटतं . . .
मी पाहतो नेहमी
एक स्वप्नं जागेपणी
तीच तू , तोच मी ,
डोळ्यातून बोलणारी ,
स्पर्शातून फुलणारी ,
ती प्रीतही तशीच आहे.
पण आज आहेत आपल्याभोवती,
सुखदु:खाच्या चार भिंती,
आपल्या छोट्याशा विश्वाची,
आपल्यापुरती समाप्ती.
या वात्सल्य विश्वात ,
रांगतंय भविष्य आपलं
एक सुंदर गोड स्वप्नं ,
आपल्या प्रीतीला पडलेलं !
माझं एव्हढ स्वप्नं,
जरा पहाटेला कळू दे.
तुझ्या कुशीत माझ्या,
प्रेमाचा अंकुर फुलू दे.
प्रेयसी :-चौकातील मुले आणि बाकी लोक
आपल्याकडे संशयाने बघतात..., नावे
ठेवतात...., त्यांना वाटते आपण टाईमपास करत आहोत .....!!
मला नाही आवडत असं..., अशाने
खर्या प्रेमाची किंमत कमी होते ना ..??? हे ऐकून प्रियकर ५०० ची नोट कढतो व
तिला विचारतो ह्याची किंमत
किती...... ????
...
प्रेयसी :- पाचशे !! प्रियकर ती नोट
चुरगाळतो आणि आता ह्याची किंमत
किती ....??? प्रेयसी :- पाचशेच !! प्रियकर :- ती नोट खाली टाकतो..., धुळीत
मिळवतो.....आता ह्याची किंमत
किती...?? प्रेयसी :- पाचशेच !! प्रियकर :- हं बरोबर ....!! आपले प्रेम
सुद्धा असेच आहे सोनू....,
लोकांनी कितीही नावे
ठेवली तरी आपल्या प्रेमाची किंमत कधीच कमी होणार नाही .....!!
तूला भेटण्याची ओढ प्रत्येक भेटीनंतर वाढतच जाते...
मला फ़क़्त इतकाच सांग असे का बर होते..??
तुझ्याशी बोलताना काळातच नाही वेळ कसा निघून जातो...
तो क्षण तिथेच थांबावा असच मनोमन वाटत राहत...
वेडे मन माझे त्याला समजाऊ तरी किती..?
तू येऊन गेलास तरी वाट पाहत राही तुजी...
क्षणाचाही दुरावा का वाटतो युगासारखा...
कल्पनेतही आहे अशक्य आता जगणे... तुझ्याविना