आयुष्य खुप थोडं असतं, त्यात आपल्याला
खुप काही हवं असतं, जे हवं असतं, ते
मिळत नसतं आणि ते मिळालं तरी खुप
काही कमी असतं, कारण कारण चांदण्यांनी
भरुन सुद्धा आपलं आभाळ रिकामचं असतं!
या छोट्याशा आयुष्यात,
प्रत्येकाचं एक स्वप्न असतं...
कुणाचं क्षणात पुर्ण होतं,
तर..
कुणाचं मरणानंतरही अपुर्ण राहतं...
.
कितीही जिवापाड प्रेम करा कुणावर...
.
कितीही जिव लावा कुणाला,
शेवटी..
.
अंतिम सत्य एकचं,
खरचं कुणीचं कुणाच नसतं
वेळ पण शिकवते आणि गुरु पण शिकवतात..
दोघात फरक फक्त इतकाच आहे कि,
गुरु शिकवून परीक्षा घेतात..
आणि
वेळ मात्र परीक्षा घेऊन शिकवते...!!
क्षण जीवनात थोडेसे आहे
उगाचं त्यांना का वाया घालवावं ...
हसत खेळत आनंदाणे जगावं .....
जीवन गीत मोठ्याने गुणगुणावं....
जिवनातील सात सहज आणि सुंदर तत्वे
१ . आपला भूतकाळ नेहमी शांतीपूर्वक असू द्या
जेणे करुन तो आपला वर्तमान बिघडवणार नाही ..
२ . कुणी आपल्याबद्दल काय विचार करतं
याचा विचार करण्याची आपल्याला गरज नाही ...
३ . जीवनातं वेळंचं आहे सारे काही म्हणून
पुरेसा वेळ घ्या आणि पुरेसा वेळ द्या ...
४ . दुसरे कोणी आपल्या अनंदाचे कारण नसते
आपल्या स्वतः व्यतिरिक्त..
५ . कधी कोणाशी तुलना करु नका कारण
आपल्याला त्या व्यक्तीच्या जीवनाची पूर्ण माहीती कधीचं नसते
६ . जास्त विचार करणे सोडा
ठीक आहे ......प्रत्येक प्रश्नाचे उत्तर माहीतचं असेल असे नाही.
७ . आनंदी असा , जगात फक्त आपल्याचं आयुष्यात
अडचणी आणि प्रश्न आहेत असं नाही
डोळयातून वाहणारं पाणी कोणीतरी पाहणारं असाव.,
हदयातून येणार दु:ख कोणीतरी जाणणारं असाव.,
मनातून येणा-या आठवणी कोणीतरी समजणारं असाव.,
जीवनात सुख :दुखात साथ देणारं एक सुंदर नातं असावं....!!!