आजूबाजूचं जग गायब होतं क्षणभर..
बाहुलीच होती ती .. शब्दशः बाहुली
सोनेरी केस.. उन्हात रंगलेले
मागे गेलेली एकच वेणी.. जीवघेणी!
हसू जरासं फसलेलं.. गावाला कळून चुकलेलं
पण पाहणाऱ्याला आठवण करून देणाऱ्या
मोगऱ्याच्या शुभ्र कळ्या.. गालभर पसरलेल्या
एखाद्या खोल दरीत घेऊन जाणारे डोळे..
टपोरे काळेभोर डोळे..,एखाद्या हरिणीचे असतात तसे..
स्वभाव.. स्वभाव काही कळला नाही पण
तेवढं मात्र राहूनच गेलं..
पण घोळक्यात फिरायची नेहमी
शेजारीशी बोलायची, अन डोळे चुकवायची नेहमी
एखाद्याला आसमंत दाखवणारी, अस्मानिची अशीच ती
सगळ्यांना भुरळ पाडेल अशी ती.., माझं पहिलं प्रेम..
जर तुम्हाला तिच्या यातना कळतात, तिने न सांगत...आणि त्याचा त्रास
तुम्हाला होतो...,
तर ते आहे प्रेम....!
जर तुमच्याकडे दुसरे आकर्षित होतात तरीही तुम्ही तिच्यासोबत राहता....,
तर ते आहे प्रेम....!
जरी तुम्हाला तिचा स्वभाव आवडत नाही आणि तुम्ही त्याला बदलण्याचा विचारही
करत नाही, तिला जसेच्या तसे स्विकारता....,
तर ते आहे प्रेम....!
जर तुम्ही तुमच्या सर्व भावना तिला देता
पण तिच्याकडून त्याची अपेक्षा करत नाही
आणि वाट पहाता की ती कधी ना कधी तिच्या सर्व भावना स्वत:हून सांगेल....,
तर ते आहे प्रेम ...
आयुष्यातला भले थोडे का होईना वेळ खूप छान जातो,
जो वेळ तुम्ही कधी विसरू नाही शकत...
डोळे लागे पर्यंत किवा झोप येत असताना हि समोरच्या व्यक्तीला मोबाईल वरून रिप्लाय देणं..
सगळे जग झोपले असताना आपण लेट नाईट च्याटींग करणं..
पूर्ण ब्यालेंस संपे पर्यंत बोलणं
ब्यालेंस कमी असेल तर तो फक्त एका व्यक्ती साठी राखून ठेवणं...
काहीही म्हणा, या गोष्टींची मजाच वेगळी...
आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा
ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.
आयुष्य सुंदर आहे......ते अजून सुंदर बनवा .
प्रियकर :
"...तू येण्याआधी मी ठरवलेल असतं
की आज तुझ्याशी खुप काही बोलावं...
पण प्रत्यक्षात जेव्हा तू येतेस ना
की मग वाटतं.., बस तुलाच बघतच रहावं ..."
प्रेयसी :
"...मी ही घरून विचार करूनच निघते
की आज तुला खुप काही सांगावं...
पण एकदा का तुझ्या मिठीत आले ना
की मग वाटतं..,जावू देत त्या गप्पा.., असच तुझ्या कुशीत रहाव......"
प्रेयसी :-
तुला कित्ती वेळा सांगितले रे
सिगारेट ओढत नको जाऊस
म्हणून ........... तू ऐकत
का नाहीस ?
प्रियकर :- अग ...... सोडण्याचा प्रयत्न करतोय,
पण सुटतच नाहीये ...त्यात
आपल्या घरचे tension देत
आहेत ....लग्नाला नाही म्हणत
आहेत .....!!
प्रेयसी :- हे tension मला पण आहे ... पण म्हणून
मी पिते
का सिगारेट ?
प्रियकर :- अग मग कसे
समजावयाचे
ह्या घरच्यांना ......... !!!
प्रेयसी :- अरे म्हणून काय, सिगारेट, दारू,
चीडचीडपणा ......हि आपल्या समस्ये
वरील औषधे आहेत का ?
प्रियकर :- हे बघ .... उगीच
मला lecture देऊ नकोस ......
त्यापेक्षा घरच्यांना कसे समजावयाचे त्याचा विचार
कर !!
प्रेयसी :-
घरच्यांच्या आधी तुला समजावणे
जास्त जरुरीचे आहे ..................
प्रियकर :- म्हणजे ? प्रेयसी :- चल माझ्या बरोबर ..
प्रियकर :- कुठे ?
(तिथेच
शेजारी असणाऱ्या गणपतीच्या मंदिरात
ती प्रेयसी त्याला घेऊन
जाते ................ मंदिरात आल्यामुळे त्याला सिगारेट फेकून
द्यावी लागते, तो नाराजीने
हाथ जोडून कपाळावर
आठ्या आणून तिच्या बरोबर
उभा राहतो)
प्रेयसी हाथ जोडून त्याला ऐकू जाईल अशा आवाजात
गणपती बाप्प्पा ला म्हणते :- हे
विघ्नहर्ता, ह्याची एक
सिगारेट म्हणजे
माझ्या आयुष्यातील एक
दिवस .......... ह्याप्रमाणे हा जेवढ्या सिगारेट पिल तेवढे
माझ्या आयुष्यातील दिवस तू
कमी कर .........
हि माझी तुझ्याकडे
प्रार्थना, ...... कारण सिगारेट
तो पितो पण धूर माझ्या हृदयातून निघतो हे
ह्याला कदाचित कधी कळणारच
नाही ......!!