प्रेम हे असच असत....
करताना ते कळत नसत आणि
केल्यावर ते उमगत नसत...
उमगल तरी समजत... नसत पण
आपल वेड मन आपलच ऐकत नसत...
प्रेमाची भावनाच खूप सुंदर असते
ती फक्त त्या दोन जीवांनाच माहित असते.
लोक म्हणतात काय असत प्रेमात..
पण मी म्हणतो करून बघा एकदा..
काय नसत प्रेमात...?
प्रेम हे सांगून होत नसत...
मित्रानो ते झाल्यावरच कळत असत..
दोन जीवांना जोडणारा तो एक नाजूक धागा असतो...
दोन हृदयांची स्पंदने एकमेकांना ऐकवणारा एक भाव असतो...
प्रेमाची परिभाषाच खूप वेगळी असते...
दोन शब्दात ती कधीच समजत नसते ....
म्हणूनच प्रेम हे असच असत
पण ते खूप खूप सुंदर असते.
" कृपया आत येवू नये "
हॄदयाच्या दारावर लिहीले
" मी हॄदयातचं आहे "
आतून प्रेमाने असे सांगीतले...
ज्या बद्दल विचार करतो
ज्या बद्दल स्वप्न पहातो........
ज्याचे गाणे आनंदाने गातो
ज्यामुळे सुखाची झोप घालवतो...
सारे सुख त्यासाठी त्यागतो .........
नसेल तर त्याचा शोध घेते ...
असेल तर गमवायला घाबरतो...
त्या आधारे सारे जीवन जगून जातो .....
निरपेक्षपणे मिळावे हेचं मागंणे मागतो
जेव्हा गवसते काय करावे समजत नाही
त्या शिवाय दुसरे काही सुचतचं नाही
शब्द अगदी छोटा पण त्याची व्याप्ती उमगत नाही
सांगायचा प्रयत्न केल्यास सांगणे जमत नाही ......
शब्दात व्यक्त करणे अशक्य .......
त्या शिवाय जगणे कधी न शक्य .....
पहा कुठेही चराचरात दिसते
मनात अंतरी खोलवर वसते .....
असे काय आहे हे का विचारतात
अरे कदाचित ह्या सार्याला ' प्रेम ' म्हणतात.....
तुमच्या आयुष्यातील सर्वात
पहिली महत्वाची गोष्ट
"कोणावर तरी प्रेम करण"
तुमच्या आयुष्यातील सर्वात
दुसरी महत्वाची गोष्ट
"तुमच्यावर कोणीतरी प्रेम करण"
तुमच्या आयुष्यातील सर्वात
तिसरी महत्वाची गोष्ट
"या दोन्ही गोष्टी एकाच वेळी होण"
गुलाबी ओठांची ती कोवळी कमान
मंदपणे काहीतरी बोलत राहते...
अल्लड, भाभडी ती तुझी नजर
तू गेल्यावर मात्र मनात सलत राहते..
तु माझ्या सोबत असलीस की,
एकटक तुला पाहावेसे वाटते..
तु मला पाहुन हसलीस की,
तिथेचं तुझे पुन्हा व्हावेसे वाटते..