कधी तू समोर दिसला की,
कुशीत येऊन तुझ्या रडावेसे वाटते..
जीव जडला आहे तुझ्यावर,
ओरडून ओरडून सांगावेसे वाटते..
तू कोण, ओळखत नाही मी तुला,
तुझ्या या शब्दाना आठवून..
मग उचलेले पाऊल,
पुन्हा मागे घ्यावेसे वाटते..
मुलगी- तु माझा पाठलाग
का करतो आहे?
मुलगा- जेव्हा मी लहान
होतो तेव्हा माझ्या आईने
मला सांगितले होते
नेहमी आपल्या स्वप्नांचा पाठलाग करावा!!
तु अशी काही पाहतेस...,
की काळीज माझं तुझं होतं..
जे कधी माझ्यासाठी धडधडायचं...,
ते आता तुझ्यासाठी धडधडतं..
एका मराठी मुलाचे
एका मराठी मुलीला म्हणणे मी चंद्र-तारे आणायच्या गोष्टी करत
नाही,
डाळ-तांदूळ आणता आले, खूप झालं:) तू नाही दिसत ऐश्वर्यासारखी! हरकत
नाही,
पण एकदम आवडलीस, खूप झालं :) काचेचं शामदान मी नाही लावू शकत छताला,
पावलापुरता प्रकाश येतोय,खूप झालं :) नको करूस पक्वान्न पंचतारांकीत
हॉटेलमधली,
दोन वेळचं रांधता येतं तुला, खूप झालं :) मला नाही जमणार तुला न्यायला लँाग
ड्राईव्हला,
ऑफिसपर्यंत सोडता आलं, खूप झालं :) तुला नाही समजली माझी कविता?
चालेल..
हिशोब समजतोय ना? खूप झालं :) नसू आपण रोमियो-ज्युलिएट, वा नसू
शिरी-
फरहाद,
दोन श्वास, एक प्राण..
खूप झालं :)
ती : तू मला कुठे सोडून तर जाणार नाहीस ना ?
तो : अग वेडे, आपली सावली कधी आपली साथ सोडते का, मी तरतुझी सावली आहे...
ती : पण मग अंधारात ? अंधारात जशी सावली आपल्याला विसरते तसं तू पण मला विसरशील ? मला अंधाराची खुप भीतीवाटते रे....
तो : भिवु नकोस. मी आहे ना. अंधार पडला तर मी लगेच तुला माझ्या मिठीत घेईनना.
ती : तसं असेल तर मग मला आयुष्यभर अंधारात जगावं लागलं तरी चालेल ...
मी माझे पाकीट उघडले..., पण रिकामे होते..!!
नंतर खिसा बघितला जेमतेम २ रुपये मिळाले ....
नाराज झालो.., खाली बसलो...,
आपण एवढे गरीब आहोत का....? असा मनात विचार आला...
तितक्यात माझा हाथ हृदयावर गेला...,
तिथे तू होतीस....!!
आणि निश्चित झालो कि आपण जगात सर्वात श्रीमंत आहोत...!!