आज हि तुला,
माझ्या समोरून जाताना पाहून...
मन रडत रे खूप माझ राहून राहून...
येतो मग पूर आपल्या आठवणींचा ,
अन नेहतो तो मला,
खूप....
खूप दूर वाहून...
पडू लागतो मग पाऊस आश्रुंचा ,
होऊ लागते मन हि माझे खट्टू,
उगच वाटू लागते मग क्षणो क्षणी,
का आले मी.....
त्या आठवणींच्या विश्वात जाऊन?..
का आले मी.....
त्या आठवणींच्या विश्वात जाऊन?..
काच बनविणार्याने जर हृदय पण काचेच बनविले असत तर फार बर झालं असत .....
कमीत कमी तोड्ण्याराच्या हाथाला जखम तरी झाली असती ........ :(
आयुष्य हा जुगार आहे
दुखः ही त्यातली हार आहे
सुख ही त्या जुगारातली जीत आहे
ती हवी तर सार्या सार्या जगाला
ओरडून, गाजावाजा करुन सांगावी
माणासानं सुख वाटुन घ्यावं
पण दुखः मात्र एकट्यानेचं सोसावं...... !
त्याचं प्रदर्शन का करावं ????
निर्णय चुकतात आयुष्यातले आणि मग आयुष्याच चुकत जाते ...
प्रश्न कळत नाही कधी कधी आणि उत्तरही चुकत जाते ..
सोडवताना वाटते , सुटत गेला गुंता .....
पण प्रत्येक वेळी 1 नवीन गाठ बनत जाते..
दाखवणाऱ्याला वाट माहित नसते ..
चालानार्याचे ध्येय मात्र हरवून जाते..
वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी ..
"अनुभव"म्हणजे काय हे तेव्हाच कळते...!!
जेव्हा एखादी" ठेच "काळजाला लागते ....!
जाउंदे तिला मला सोडून दुसर्याच्या मिठी मध्ये :-(
तसेही .............
एवढं प्रेम करून सुद्धा जी माझी नाही होऊ शकली, ती दुसर्याची तरी काय होणार ?"
प्रेम असत झाडाचा मातीमधला खोल संबंध
प्रेम असत पाखरांच्या पंखामधला मुक्तछंद
प्रेम असत गहिर्या गहिर्या डोळ्यामधली खोल आस
प्रेम असत तडफडणार्या आयुष्याचा अंतिम श्वास...