तुझे प्रेमळ दोन शब्द...
मनात उमंग भरतात...,
आयुष्य का जगावे ...
याला ते कारण बनतात....
झुरलीस जरी माझ्यासाठी,
मलाच सांगायला राहिलीस तू
मी मात्र समजलो कि,
तुझ्याच नादात वाहिलीस तू..
प्रियकर :- २ मिनीट डोळे बंद करतेस का?
प्रेयसी :- हो हे बघ केले...
प्रियकर :- खुप अंधार दिसतोयना ?
प्रेयसी :- हो...
प्रियकर :- असे आहे माझे आयुष्य तुझ्याशिवाय....
तुम्हाला माहिती आहे,
देवाने असे का केले कि,
आपल्याला दोन हात, दोन पाय,दोन डोळे दिले
पण हृदय मात्र एकाच दिले?
कारण ह्या पृथ्वीवर येऊन आपण आपल्या आवडीचे
दुसरे हृदय शोधावे म्हणून .......
न सांगता कळणारे, अन कळून हि न
सांगता येणारे...
असे हे प्रेम असते...
डोळ्यात नेहमी दिसणारे,पण
वाचता न येणारे...
... असे हे प्रेम असते...
काळजीतून कळणारे,पण कळूनही न
वळणारे...
असे हे प्रेम असते...
कधी कधी बोलून हि न
मिळणारे,अन कधी कधी न
बोलतास आपलेसे करणारे...
असे हे प्रेम असते...
जीवाला जीव लावणारे,अन
कधी कधी जीवासाठी जीव
हि देणारे..
असे हे प्रेम असते...
मोठं होण्यासाठी कधितरी लहान होऊन जगाव लागतं,
सुख मिळवण्यासाठी दुःखाच्या सागरात पोहाव लागत,
मनापासुन प्रेम करणारा कधिच वेडा नसतो कारण ते वेड समजून घेण्यासाठी कधितरी मनापासून प्रेम कराव लागतं