डोळे मिटुन प्रेम करते, ती प्रियासी .....
डोळे मिटल्यासारखे प्रेम करते, ती मैत्रिण ......
डोळे वटारुण प्रेम करते, ती पत्नी ......
आणि
डोळे मिटेपर्यँत प्रेमकरते, ती फक्त आई .....
एका मुलाने ब्रेकअपच्या वेळी केलेलं वक्तव्य..
" माझं प्रेम तु जरी मान्य केल नाही,
तरी मी तुझ्यासाठी जीव नाही देणार..
तुला दुसरा मुलगा जरूर मिळेल,
पण ?????
माझ्या आईला पुन्हा मी मिळणार नाही.. "
आई - बाबा
आईने बनवल, बाबानी घडवल,
आईने शब्दान्ची ओळखकरुन दिली,
बाबानी शब्दान्चा अर्थ समजवला.
आईने विचार दिले, बाबानी स्वातंत्र्य दिले,
आईने भक्ती शिकवली, बाबानी व्रुती शिकवली,
आईने लढण्यासठी शक्ती दिली,
बाबानी जिकण्यासाठी नीती दिली,
त्यान्च्या परिश्रमामुळे यश माझ्या हाती आहे
आई
दोन शब्दात सार आकाश सामाऊन घेई,
मिठीत तिने घेता लहान वाटे भुई,
ओरडा हि तिचा भासे जणू गोड गाणी,
वादळ वारे, ऋतू सारे तिच्याच मिठीत विरून जाई!
खरच का ग आई!!
सात जन्म असतात का ?
आवडत्या माणसा बरोबर पुढचा जन्म मागतात का?
प्रत्येक सातव्या जन्मी मी सात जन्म मागणार आहे , तुमच्याच पोटी येण्यासाठी मी एक तरी तप करणार आहे
प्रत्येक पुढचा जन्म माझी तूच आई व्हाविस , अणि जन्म घेण्याआधीच मला त्याची माहिती असावी
तुझ बोट धरून मी इवली पवल चालेन, इवली इवली पाव...ल म्हणत प्रत्येक जन्म तुझ्याबरोबर चालेन...
ह्या जन्मात तुझ्या डोळ्यात पाणी मी बघितल आहे, पण तुला हसवान्या साठी मला परत जन्मा घ्यायचा... विस्तृतखरच का ग आई.!!
सात जन्म असतात का ?
आवडत्या माणसा बरोबर पुढचा जन्म मागतात का?
प्रत्येक सातव्या जन्मी मी सात जन्म मागणार आहे , तुमच्याच पोटी येण्यासाठी मी एक तरी तप करणार आहे
प्रत्येक पुढचा जन्म माझी तूच आई व्हाविस , अणि जन्म घेण्याआधीच मला त्याची माहिती असावी
तुझ बोट धरून मी इवली पवल चालेन, इवली इवली पाव...ल म्हणत प्रत्येक जन्म तुझ्याबरोबर चालेन....
ह्या जन्मात तुझ्या डोळ्यात पाणी मी बघितल आहे, पण तुला हसवान्या साठी मला परत जन्मा घ्यायचा आहे..
देता असता आला तर माझ उरलेला आयुष्य दोघाना देइन, अणि पुढचा जन्म घेई पर्यंत तुझ्या मनामधे रहिन...
आईस लिहिलेले पत्र :-
प्रिय आईस,
पत्ता :- देवाचे घर....
तुझा हात हवा होता सदा माझ्या उश्यावर,
थापटून मला झोपवायला, अचानक जाग आल्यावर.
मी अजून सुद्धा दचकून जागा होतो मधीच,
तुझी काळजी रात्रभर सतावत राहते उगीच.
तू का इतक्या लवकर सोडून गेलीस गाव माझं,
'आईविना पोर'असं घेतात लोक नाव माझं.
वरवरच्या पदार्थाची मला चवंच लागत नाही,
काय करू, तुझ्या दुधाविना माझी भूकच भागत नाही.
पोरकेपणाचा माझ्याभोवती का ठेऊन गेलीस जाळ,
का खरंच इतकी कच्ची होती तुझ्या माझ्यातली नाळ.
तिथं कुणी आहे का तुझ्याशी बोलायला भरपूर,
उगाच रडत राहू नकोस दाबून स्वतःचा ऊर.
बघं आता आई मी रडत नाही पडलो तरी,
मला ठाऊक आहे तू गेली आहेस देवा घरी.
भूक लागली तरी बिलकुल मी रडत नाही,
कारण मी हसल्याशिवाय तुला चैन पडत नाही.
पण रोज रात्र झाली की तुझ्या आठवणींचा थवा येतो,
अंथरुणात लपून, पुसून डोळे मी गप्प झोपी जातो.
बघं तुझं बाळ किती समजूतदार झालं आहे,
आणि वय कळण्याआधी वेडं वयात आलं आहे.
अजिबात म्हणजे अजिबात त्रास देत नाही पप्पाला,
तुझी काळजी तेवढी मात्र घ्यायला सांग देवबाप्पाला.
आणि सांग की हे शहाणं बाळही आहे जरा हट्टी,
जर का काही झालं तुला तर घेईन म्हणावं कट्टी.
मी आता थकलोय तुला ढगांमध्ये पाहून,
ये आता भेटायला नजर तिथली चुकवून.
जमलं जर का सुट्टी घ्यायला तर ये निघून अशीच,
पोट भरतं गं रोज पण मायेची भूक अजून तशीच...
-तुझाच लाडका.