एकदा एका जोकर ने लोकांना खूप छान जोक
सांगितला लोक खूप हसले...
परत त्याने दुसर्यांदा तोच जोक
सांगितला लोककमी हसले ....
परत तिसर्यांना त्याने तोच जोक सांगितला ,
काहीच लोक हसले ..
त्याने वारंवार तोच जोक सांगितला , लोक
हसेनासे झाले...
आता त्याने एक महत्वाची गोष्ट
लोकांना सांगितली कि,
"जर एखाद्या आनंदावर तुम्ही वारंवार
आनंदी होऊ शकत नाही तर..
एखाद्या दुखावर तुम्ही वारंवार दुःखी कसे काय
होऊ शकतात "
"बाप बाप असतो...
तो काही शाप नसतो....
तो आतून कँनव्हास असतो...
मुलासाठी राब-राब राबतो...
बुडणार्या सुर्याकडे उगाच पाहत बसतो.
पायाच्या नखानी माती उकरत असतो.
शेवटी सर्वानीच साथ सोडली असते.
पाखरं घर सोडून दुर निघुन गेलेली असतात.
बाप मात्र आपल्या पाखराची वाट पाहतो.
कुणाची मदत
करत असताना
त्याचा डोळ्यात
बघू नका
कारण
त्याचे झुकलेले
डोळे तुमच्या
मनात गर्व निर्माण
करू शकतो.
देवाकडे फोन नाही तरी, मी त्याच्याशी बोलतो
देवाकडे फेसबुक नाही , तरी मी त्याचा जवळचा मित्र आहे
देवाकडे ट्विटर देखील नाही , पण तरीही मी त्याला फोलो करतो
एका लहान मुलाचा वाढदिवस असतो...
तो त्याच्या वडिलांना विचारतो, "बाबा तुम्ही माझ्या वाढदिवसाला असे जुने कपडे का घातले आहेत ??"
तेव्हा त्याचे वडील म्हणाले : "कारण माझ्या कडे तितकेच पैसे आहेत बाला कि मी एका साठीच कपडे घेवू शक्रो...
... आणि आताच्या घडीला माझ्या साठी तुला कपडे मिळण महत्वाचा आहे...."
२० वर्षांचा काळ लोटला आता वडील मुलाला विचारत होते "अरे तू सगळी रक्कम जमा का करत आहेस आणि जुनीच कपडे घालून फिरतोस..."
मुलगा म्हणाला: "बाबा मला एका घर घ्यायचंय त्या मानसासाठी ज्याने मला इतका खालून वर आणलं
त्यांनी मला एक ओळख मिळवून दिली...."
बाप हि निशब्द झाला मनात म्हटला"जीवन सार्थ झाल... आता डोळे मिटलो तरी चिंता नाही...."
मुलगा लगेच म्हणाला"बाबा मला तुमची अजून हि गरज
आहे..."
खरं बोलून मन दुखावलं तरी चालेल..
पण खोटं बोलून आनंद देण्याचा प्रयत्न करू नका.