तुझी आठवण आली की मी हसत राहीन या जन्मी मी तुझा झालो नाही तरी पुढ्च्या जन्मी नक्कीच होईन.
तळहातावर वेचलेल्या फुलांचा सुगंध जेव्हा घेईन
तेव्हा तुझी आठवण येईल...
पावसाच्या कोसळणाऱ्या जलधारांमध्ये जेव्हा भिजेन
तेव्हा तुझी आठवण येईल...
संध्याकाळचा गारा वारा मला सुखावेल तेव्हा तुझी आठवण येईल...
पाण्यावर तरंगणाऱ्या चांदण्यांना हळुवार स्पर्श करेल
तेव्हा तुझी आठवण येईल...
जेव्हा जेव्हा माझे हृदय धडकेल
तेव्हा तुझी आठवण येईल... तुझ्यावर माझ्यापेक्षाही खूप प्रेम करते मी शेवटचा श्वास
घेईपर्यंत मला तुझी आठवण
येईल...
महिण्यातील प्रत्येक दिवसाला,
दिवसातील प्रत्येक तासाला,
तासाच्या प्रत्येक मिनिँटाला आठवण येते तुझी क्षणाक्षणाला
आठवण ...., आठवण आहे....,
तिचं कामच आहे
आठवत राहणे ..,
ती कधी वेळ
काळ बघत नाही ..,
तिला वाटते तेव्हा
येऊन जाते ..,
कधी हसवते
तर ..,
कधी रडवून जाते
तू नाही भेटत,
याचे नाही काहीच दु:ख मला..
तू नाहीस तरी,
तुझ्या आठवणींनी कुठं सोडलय मला..?
माहीत आहे आठवणी,
तुझी जागा नाही घेऊ शकत..
पण तुझ्याविना,
मी जगु ही नाही शकत..
रोज तुझी आठवण येते आणि
डोळ्यांत पाणी उभं राह्तं...,
तू जवळ हवास असं वाटताना
खूप दूर आहेस..,हे सांगून जातं..