एकदा तरुण मुलांचा ग्रुप देव-दर्शनाला निघाला होता.
त्यावेळी त्यांचे मास्तर त्यांना म्हणाले.
"वाटेत कुणी एखादी सुंदर मुलगी दिसली तर मनात वाईट विचार आणू नका"
३ वेळा "हरी ओम" म्हणा
२-३ दिवसानंतर एक जण
"हरी ओम हरी ओम हरी ओम"
तेव्हा बाकीचे सगळे जण
कुठे आहे... कुठे आहे.... कुठे आहे ?? :D:D:D:D:P
अमेरिकेत एका बाईला एक कुत्रा चावत होता..
तर एका माणसाने
त्या कुत्र्याच्या पेकाटात लाट
घातली आणि कुत्र्याला मारून टाकलं.
पेपर मध्ये न्युज : अमेरिकन हिरो ने एका बाईला पिसाळलेल्या कुत्र्यापासून
वाचवलं..
माणूस - मी अमेरिकन नाहीये..
दुसर्या दिवशी पेपर मध्ये न्युज - एका विदेशी हिरो ने
एका बाईला पिसाळलेल्या कुत्र्यापासून वाचवलं..
माणूस - मी पाकिस्तानी आहे..
तिसर्या दिवशी पेपर मध्ये न्युज - एका अतिरेक्याने
एका निष्पाप कुत्र्याला मारलं..
१ मुलगी : आज कालच्या मुलावर विश्वासच करायला नको ,
मी तर आता त्याच थोबड़ पण बघणार नाही.
२ मुलगी : का ग ? काय झाले? दुसऱ्या कुठल्या मुली सोबत
फिरत होता काय तो ???
१ मुलगी :नाही ग तो नाही फिरत होता , मी फिरत होते अणि त्याने मला पाहिले ..
... मला बोलला होता मी कामा साठी कोल्हापुर ला जातोय ३ - ४
दिवसानीयेणार ... आणि गेलाच नाही ...
साला हलकट , धोकेबाज , नालायक, खोटारडा..
मध्यम वयाची शिक्षिका शाळेत व्याकरणातले काळ शिकवत असते....
सोप्पा प्रश्न विचारते....
सांगा, "मी सुंदर आहे..."
हा कोणता काळ आहे???
.
.
.
.
.
.
.
.
कोपरातून आवाज येतो, "भूत-काळ" भवाने.... :P :P
ब्रेक अप नंतर पण स्मार्ट पोपट"
मुलगी-: लक्षात ठेव,
तुला पुन्हा माझ्यासारखी मुलगी नाही भेटणार.
.
.
.
.
.
.
.
.
.
मुलगा-: चिल बेबी चिल....
मला तुच आवडत नाहीस तर शोधेन
तरी कशाला तुझ्यासारखी परत..
टीवी वाला एकदा एका शेतकर्याची मुलाखत घेत असतो
टीवी वाला : तुम्ही बकरीला काय खाऊ घालता??
शेतकरी : कोणत्या काळया की पांढऱ्या ??
टीवी वाला : पांढर्या
शेतकरी : गवत
टीवी वाला : आणि काळ्या ?
शेतकरी : गवतच.
टीवी वाला : तुम्ही बकरीला कुठे ठेवता ?
शेतकरी : कोणत्या काळया की पांढऱ्या ??
टीवी वाला : पांढर्या ?
शेतकरी : दारात
टीवी वाला : आणि काळ्या ?
शेतकरी : दारातच ..
टीवी वाला : तुम्ही बकर्यांना कशाने धुता ?
शेतकरी : कोणत्या काळ्या कि पांढर्या ?
टीवी वाला : पांढर्या ??
शेतकरी : पाण्याने फक्त ..
टीवी वाला : आणि काळ्या ?
शेतकरी : पाण्यानेच .
टीवी वाला (वैतागून ): तुम्ही दोन्ही बकर्या सारख्याच सांभाळता मग सारख का विचारता काळ्या कि पांढर्या ?
शेतकरी : कारण पांढरी बकरी माझी आहे ..
टीवी वाला : आणि काळी ??
.
.
.
.
.
.
.
.
.
.
शेतकरी : ती पण माझीच आहे ;)