मेणबत्ती मधला धागा मेणबत्तीला म्हणाला.....
मी जळत असतो तेव्हा तु का विरघळत असते....?????
मेणबत्ती म्हणाली: " ज्याला हदयात जागा दिली तो सोडुन चालला असेल तर कोणाच्याही डोळयातुन पाणी येणारच ना..!!!
काही नाती तुटत नाहीत,
ती आपल्या नकळत मिटून जातात,
जशी बोटांवर रंग ठेवून
फ़ुलपाख्ररे हातून सुटून जातात...!
"एक मुलगा व मुलगी खेळत
होते ........... मुलाकडे
प्लास्टिकची फुले होती व मुलीकडे
चोकलेट्स होती.
दोघे ठरवतात कि ते एकमेकांना सर्व फुले व चोकलेट्स देतील
त्याप्रमाणे त्या मुलाने एक मोठे फुल आपल्याकडे ठेवून बाकी सर्व फुले तिला दिली, पण तिने मात्र
बोलल्याप्रमाणे सर्व चोकलेट्स
त्या मुलाला दिली.
त्या दिवशी रात्री त्या मुलीला शांत झोप लागली, पण मुलगा मात्र विचार
करत बसला, "कि जसे मी एक फुल तिच्यापासून लपविले तसे काय तिने
सुद्धा एक चोकलेट माझ्यापासून लपविले असेल का " ? ह्या शंकेने त्याचे मन विचलित झाले व त्याला सुखाची झोप
मिळाली नाही.
तात्पर्य :- जर तुमच्या नातेसंबंधा मध्ये तुम्ही दुसर्याला आपले सर्वस्व अर्पण केले नाहीत, तर तुमच्याच मनामध्ये
शंका कुशंकांचा गोंधळ नेहमी नाचत राहणार.
खरी माणसे हि जगातील सर्वात सुंदर मुलीवर प्रेम करत नाही . . . ..
ती माणसे,
जी मुलगी त्यांचे जीवन सुंदर बनवते तिच्यावर
प्रेम करतात.
थंडी वाढत चालली होती...
बहिणीला स्वेटर घेण्याइतके पैसे भावाकडे
नव्हते..
घरात कापड हि नव्हती..
जी पांघरता आली असती...
मजुरीचे पैसे जेवण घेण्यात गेले होते...
घरी आल्यावर ती म्हणाली "दादा अरे आज थंडी पडलीये रे खूप..."
विनीत म्हणाला:आग हो तू एक काम कर...
मला गरम होतंय ग... तू माझा shirt घाल
आणि झोप...
रात्र वाढली थंडी वाढली...विनीत च्या दातांच्या कडकण्याच्या आवाजाने ती जागी झाली...
आणि तिला माहित होत दादा बोलणारच नाही ...
तिने एक स्वेटर विणल होत ते तिने हळूच
अंगावरघटल त्याच्या,....
आणि सकाळी उठण्या आधी स्वेटर काढलं
असं रोज चालायचं
एक दिवस विनीत ने सकाळी उठल्य्वर म्हटलं "अग तुला माहितीये मला जराहि थंडी वाजत नाही रात्रीची...." )
आणि ती मनातल्या मनात हसायची आणि म्हणायची"वेड्या दादाची वेडी हि माया..."
आयुष्यत दुसर्यांना ममता द्या ती तुमच्या कडे तशीच येते कि नाही ते पहा...
संपूर्ण जग सुंदर आहे , फक्त
तसं
पाहायला हवं,
प्रत्येक नात जवळचं आहे,
फक्तते
उमजायला हवं,
प्रत्येक गोष्टीला अर्थ
आहे, फक्त ते
समजायला हवं,
प्रत्येकांकडून प्रेम
आणि जिव्हाळा मिळतो,
फक्त
निस्वार्थी असायला हवं.