वाट पाहशील तर आठवण बनून येईन
तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन
एकदा मनापासून मला आठवून तर बघ
तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन!!!!!!!!
झरे आणि डोळे यांना फक्त वाहणे माहित असते,
फरक एवढाच आहे की..?
झरे वाहतात
तळ्यांच्या साठवणीत..
आणि.
डोळे वाहतात
कुणाच्या तरी आठवणीत....
एक दिवस जेव्हा
माझा श्वास बंद होईल..
.
नको विचार करुस
की माझे प्रेम कमी होईल..
... ... .
अंतर फक्त एवढं असेल..?
.
आज मी तुझी
आठवण काढत आहे..
.
उद्या..?
.
माझी आठवण तुला येईल...!!!
दिवस सरत जाणार पण तुझी आठवण नाही सरणार,
एक आठवण गेली तरी तुझी दुसरी आठवण मनावर ताबा घेणार,
तुला विसरण्याचा मी उगाच एक खोटा प्रयत्न करणार,
आणि जगण्याची इच्छा नसतानाही तुझी आठवण जपण्यासाठी जगात राहणार....!!!
तुझी आठवण कधी,
खूप रडवते..
जे कधी घडणारचं नाही,
असे स्वप्न देते..
आसवांचे असंख्य,
ठिपके डोळ्यांत देते..
अलवार जाणीवेच्या झुल्यावर,
एकटे सोडून जाते..
वेदनेच्या जंगलात हृदय हाती,
घेऊन फिरावे
लागते..
काही नाही जरी बोलली तरी,
तू खूप
काही बोलून जाते..
आणि..?????
हात पुढे करण्याआधीचं,
तू खूप दूर खूप दूर
गेलेली असते..
प्रेमात तुला दूर करणे कठीण होते..,
ते वादळ डोळ्यात ठेवणे कठीण होते..,
सोपे वाटले तुझ्या आठवणीत मरणे...
कारण..???
तुला विसरून जगणे फार कठीण होते..