जर मुलीला उलटी व्हायला लागली तर तिच्या घरचे
विचारतात...
"कोण आहे तो हरामखोर ??"
आणि जर मुलाला उलटी व्हायला लागली तर
त्याच्या घरचे विचारतात...
"काय रे हरामखोरा किती पिलास...??"
.
तात्पर्य - उलटी मुलाला होवो
अथवा मुलीला "हरामखोर" नेहमी मुलगाच
असतो..!!!
फेसबुक वर एखादी मुलगी तुमच्याशी बोलायला तयार होत नसेल .
तर तुम्ही तिच्याशी कस बोलणार?
.
विचार करा जरा..
.
.
.
.
.
.
.
.
नाही सुचत
मी सांगतो तुम्हाला ....
तिच्या वॉल वर जावून फक्त लिहा
"मला आय लव यु असा म्यासेज का पाठवलास" :D :D
माझी लाईफ स्टाईल
दोन प्रकरच्या पोरींच्या मागे तुम्ही नका धाऊ.
१) ज्यांच्या मागे मी आहे, कारण त्या तुम्हाला कधीच
नाही पटणार.
२) ज्यांच्या मागे मी नाही, कारण
ज्या मला नाही पटल्या, त्या तुम्हाला काय पटणार.
:p
{ दारूचा पाढा }
दारू एके दारू, पार्टी झाली सुरु.
दारू दुणे ग्लास, मजा येईल खास.
दारू त्रिक वाईन, वाटे कसे फाईन.
दारू चोक बियर , टाका पुढचा गिअर.
दारू पंचे रम, विसरून जाऊ गम.
दारू सक ब्रँडी, आण चिकन अंडी.
दारू सात विस्की, कॉकटेल करता रिस्की.
दारू आठ बेवडा, आणा शेव चिवडा.
दारू नव कंट्री, मारा परत एंट्री.
दारू दाहे प्याला, स्वर्ग सुखी न्हाला...! ;)
नाव - रजनी ...रजनी कांत ..
हॉबी - हाताने बंदुकीची गोळी पकडणे..सिंहाचे दात तोडून जमा करणे..
रेकॉर्ड - जीराफ्च्या मानेची गाठ बांधली..
Most embarrassing मोमेंट - एका बुक्कीत १०० हत्तींना नाही मारू शकलो..फक्त ९९ मेले.
वेडे पणा - त्सुनामी मध्ये पोहलो ..
achievement - लावा मध्ये स्केटिंग केली.
स्वतःवर गर्व - जेव्हा मला पाहून ४० फूट लांब अजगर पळून गेला.
निबंध :- माझा आवडता पक्षी : कोंबडी
मला सगळेच प्राणी आवडतात. प्राणी खुप चविष्ट लागतात.
कोंबडी विशेषतः अधिक चविष्ट असल्याने माझा आवडता पक्षी आहे.
...कोंबडीपासुन वेगवेगळे पदार्थ बनवता येतात. मला ते बनवता येत नाहीत पण खाता येतात.
कोंबडी शाकाहारी असते. त्यामुळे मला तिचा आदर वाटतो. गांधीजी सुध्धा शाकाहारी होते म्हणुन मला त्यांचा सुध्धा आदर वाटतो.
कोंबडीला ताप येतो. ताप आल्यावर माणसे पाणी उकळवून पितात. पण ताप आलेली कोंबडी चांगली उकळवून न घेता खाल्ली तर तो ताप माणसाला होऊन त्याच्यामुळे होणारा ताप कायमचा जाऊ शकतो. याच तापाला "बर्ड फ्यु" का असेच काहीतरी नाव इंग्रजी नाव आहे. मला गणित व इंग्रजी येत नसल्याने मला शाळेत खुप ताप होतो.
कोंबडीला दगड मारल्यावर ती पकाक असा आवाज काढते. मला तो खूप आवडतो. नाना पाटेकरचा पक पक पकाक असा सिनेमा आहे. भरत जाधवचा पण जत्रा नावाचा कोंबडीवर सिनेमा आहे. तो मात्र अतिशय वाईट होता. सिनेमा बघणे वाईट असते असे मोठी माणसे सांगतात पण मला सिनेमा पाहणे आवडते.
पुर्वीचे लोक कोंबड्या चोरत त्यांना कोंबडीचोर म्हनत. चोरी करणे चूक आहे. चोरी केल्यावर आजकाल जेलमध्ये टाकतात. पुर्वी जेलमध्ये जाणे वाईट मानत व लोक त्यांचा तिरस्कार करत पण आज जेलमध्ये जाणार्याला लोक नेता म्हणुन निवडून देउन "लोकसभा" नावाच्या ठिकाणी पाठवतात. तिथे गेल्याने माणुस खुप श्रिमंत होतो असे माझे बाबा सांगतात.
कोंबदी अंडे देते. ते बहूपयोगी आहे. "आओ सिखाउ तुम्हे अण्डे का फण्डा" या गाण्यात त्याचे वर्णन आहे. त्या गण्यात मोनीका बेदी आहे. तिला जेलमध्ये अंडी देत होते.
अंडे संडे या मंडे खाल्ले पाहीजे. मंडेला काही लोकांचा उपास असतो. नेल्सन मंडेला यांचा उपास असतो का हे मला माहित नाही. असो....कोंबडीचा बळी देतात. बळी देणे वाईट प्रथा आहे असे परवा गुरूजी कोंबडीवडे खाताना सांगत होते. गुरूजींना जाड भींगाचा चष्मा आहे. वाह्यात मुले त्याना कोंबडी पकड असे म्हणतात. कोंबदीला पळत जाऊन पकडने माणसाला हुशार बनवते.