जगात तिन प्रकारचे लोक असतात.
काहीजण एकटे राहतात आणि स्वत:च्या भरवश्यावर जिवनात आश्चर्यकारक गोष्टी घडवून आणतात.
काहीजण गर्लफ़्रेन्ड बनवतात आणि जिवनात आश्चर्यकारक गोष्टी घडतांना बघतात.
आणि बाकिचे लग्न करतात आणि जिवनात जे घडतं त्यावर आश्चर्य करीत राहतात.
मेघ गर्जतो...गर्जतो
काळजाचे होते पाणी...
अन डोळ्यांत अजुनही .....
तुझ्या ओठांतली गाणी
अबोल...पापण्यांनी
आसवांचा घात केला....
थेंब बोलके झाले नयनांना....
स्वप्नांचा भार झाला
मेघ होईल बोलका..
अन तुला कळेल सारं...
खोल मनांत दाबलेलं..
ओघळल्या थेंबासहीत...वेडे..
प्रेम माझे वाहीलेलं
बंडू : एकदा मी संडासला गेलो तर संडासात एक वाघ बसलेला.
पांडू : मग रे ?
बंडू : मग काय .... मी त्याला बोललो, तू करून घे निवांत .... माझी चड्डीतच झालीये !!! ;)
तुझी आठवण आली की माहितेय काय होते ??
तुझी आठवण आली की माहितेय काय होते ??
वारा कसा मंद मंद वाहतो...
मनाला कसा हलकेच स्पर्शुन जातो...
तुझी आठवण आली की माहितेय काय होते ??
सरी कशा थेंब थेंब बरसतात...
मनाला कशा चिंब चिंब भिजवतात...
तुझी आठवण आली की माहितेय काय होते ??
मोगरा ही गंध गंधित होतो...
मनाला ही धुंद मोहरून नेतो ...
तुझी आठवण आली की माहितेय काय होते ???
अश्रु ही कसे झर झर झरतात...
तुला पाहण्यासाठी डोळे किती किती तरसतात...
तुझी आठवण आली की माहितेय काय होते???
स्पंदनंचा ताल ताल हरवतो
प्रीत वेडया गीतांचा सुर ही ना गवसतो
तुझी आठवण आली की माहितेय काय होते???
माझे शब्द नी शब्द विखुरतात
माझ्या कविता ही मजला ना स्फुरातात
तुझी आठवण आली की माहितेय काय होते??
आयुष्यात खुप माणसं येतात जातात .....
काही माणसं मेहंदी सारखी असतात
कोरा असतो हात .... ती अगदी अलगदपणे हातावर उतरतात ......
त्यांची नाजुक नक्षी आणि तो मेंदीचा धुंद करणारा सुगंधही आपल्या जीवनात घेउन येतात....
खुप हरवून जातो आपण त्यांच्या रंगात... रंगत जातो....
आणि मग हलू हलू ... तो रंग... तो वास फिकट होंत जातो.....
आणि त्या माणसाचे अस्तित्व पण दूर होते आपल्या आयुष्यातून..
पुन्हा तो कोरा हात आणि मनात त्या रंग, सुगंधी, नक्षीदार आठवणी.....
तर काही माणस असतात ती तळ्यात पड़णlऱ्या दगडासारखी ....
शांत पाण्यात खळबलात माजवनारी......
ती पाण्यात पडताच तरंगावर तरंग येतात जीवनात .....
अनपेक्षीतरित्या येतात ही माणस ... धवलून काढतात जीवन....
मग कधी खालचा गाळ ही वरती येतो.... गधूळता वरती येते आपल्या जीवनातली.....
आपण सवारेपर्यंत तो गाळ जगासमोर येतो आणि ही माणस गायब होतात
त्या तलाताच खोल कुठेतरी
तर कधी काही माणस असतात मृग जला सारखी ......
त्यांच्या मागे आपण धावत असतो...ओढीने... l
पण ती तर मृगजळच ना....न हाती येणारी.....
तरीही त्या तहानलेल्या जीवाला दुसर काही दिसतच नाही...
एकदा एक मुलगा जंगलात बेचकी नी नेम धरून पक्षी उडवत असतो.
तर त्याचा नेम लागत नाही आणि तो बोलतो "च्या..यला नेम चुकला.."
तर तिथे बसलेला एक साधू त्याला बोलतो की" बेटा असा नाही बोलायचा , हे
अपशब्द आहेत, लहान मुलांनी असा नाही वागायचे ".
त्यानंतर परत तो मुलगा नेम लावतो आणि त्याचा नेम चुकतो आणि तो परत बोलतो
"च्या..यला नेम चुकला.." ..
हे तो साधू परत ऐकतो आणि परत त्याला तेच समजवतो…
तरीही तो मुलगा ऐकत नाही आणि तिसररयांदा सुद्धा परत तसेच करतो
"च्या..यला नेम चुकला.."
आता तो साधू भडकतो आणि त्या मुलाला शाप देतो..
"आता विजांचा कडकडाट होईल आणि आकाशातुन एक वीज येऊन तुझ्या अंगावर पडेल."
साधू महाराजांनी बोल्या प्रमाणे आकाशात विजांचा कडकडाट होतो आणि एक वीज
येऊन त्या मुलाच्या ऐवजी चुकुन त्या साधू वर पडते
त्याच बरोबर आकाशातुन एक आवाज़ येतो
"च्या..यला नेम चुकला"