"माझे तुझ्यावरचे प्रेम हे एका कागदा सारखे आहे, एक असा कागद ज्यावर तू तुझी भावना लिहू शकतोस , तुझा राग खरडू शकतोस , तुझे आश्रू पुसण्यासाठी मला वापरू शकतोस , फक्त वापरून झाल्यावर मला फेकून देऊ नकोस, कारण मला सदैव तुझ्याबरोबर राहायचे आहे ...
पण हो, जर तुला खूप थंडी वाजून आली तर मात्र उब मिळविण्यासाठी तू मला जाळू शकतोस ...
कारण मरताणा सुद्धा तुला उब देण्यासारख निस्वार्थी प्रेम मी तुज्यावर करते "
खरच का ग आई!!
सात जन्म असतात का ?
आवडत्या माणसा बरोबर पुढचा जन्म मागतात का?
प्रत्येक सातव्या जन्मी मी सात जन्म मागणार आहे , तुमच्याच पोटी येण्यासाठी मी एक तरी तप करणार आहे
प्रत्येक पुढचा जन्म माझी तूच आई व्हाविस , अणि जन्म घेण्याआधीच मला त्याची माहिती असावी
तुझ बोट धरून मी इवली पवल चालेन, इवली इवली पाव...ल म्हणत प्रत्येक जन्म तुझ्याबरोबर चालेन...
ह्या जन्मात तुझ्या डोळ्यात पाणी मी बघितल आहे, पण तुला हसवान्या साठी मला परत जन्मा घ्यायचा... विस्तृतखरच का ग आई.!!
सात जन्म असतात का ?
आवडत्या माणसा बरोबर पुढचा जन्म मागतात का?
प्रत्येक सातव्या जन्मी मी सात जन्म मागणार आहे , तुमच्याच पोटी येण्यासाठी मी एक तरी तप करणार आहे
प्रत्येक पुढचा जन्म माझी तूच आई व्हाविस , अणि जन्म घेण्याआधीच मला त्याची माहिती असावी
तुझ बोट धरून मी इवली पवल चालेन, इवली इवली पाव...ल म्हणत प्रत्येक जन्म तुझ्याबरोबर चालेन....
ह्या जन्मात तुझ्या डोळ्यात पाणी मी बघितल आहे, पण तुला हसवान्या साठी मला परत जन्मा घ्यायचा आहे..
देता असता आला तर माझ उरलेला आयुष्य दोघाना देइन, अणि पुढचा जन्म घेई पर्यंत तुझ्या मनामधे रहिन...
प्रत्येकाच्या जीवनात प्रेमाचं वादळ येत असतं.
कोणी भरकटत असतं,
तर कोणी टिकत असतं.
कोणी व्यक्त करत असतं,
तर कोणी लपवतं असतं.
प्रेम लपत नसतं तसचं दिसतही नसतं,
असं हे प्रेम असतं.
मुलगा : तू उपाशीपोटी किती सफरचंद खाउ शकतेस ?
मुलगी : सहा
...
मुलगा : चुक..... फक्त १
कारण १ सफरचंद खाल्ल्यानंतर तू उपाशीपोटी नसते...
मुलगी : मस्त सूपर जोक आहे हा...
मग ती मुलगी आपल्या मैत्रिणी ला हा जोक
सांगायला जाते
सांग ग मयुरी तू उपाशीपोटी किती सफरचंद खाउ
शकतेस ?
मयुरी : नउ
मुलगी : तू ६ बोलली असतीस तर मी तुला एक मस्त जोक
सांगणार होते...
मित्र बोलतात मला,
आठऊ नकोस रे तिला,
तिला तू विसरण्याचा प्रयत्न कर...
ती नव्हतीच कधी तुझ्यासाठी,
हे आता, मानण्याचा तू प्रयत्न कर...
ती परत येणार नाही तुझ्या आयुष्यात,....
उठ आता,
अन पुढे चालण्याचा तू प्रयत्न कर...
सिगरेटच्या धुरात शोधणं, सोडून दे रे तिला,
ती गेली हे मानून,
आता तरी तू जगण्याचा प्रयत्न कर...
रडणं सोड रे तिझ्यासाठी तू आता,
उघड्या डोळ्याने, या दुनिये कडे पाहा ,
ह्या सुंदर दुनिये कडे पाहता पाहता,
आता तरी तू हसण्याचा प्रयत्न कर...
आता तरी तू हसण्याचा प्रयत्न कर.
आईस लिहिलेले पत्र :-
प्रिय आईस,
पत्ता :- देवाचे घर....
तुझा हात हवा होता सदा माझ्या उश्यावर,
थापटून मला झोपवायला, अचानक जाग आल्यावर.
मी अजून सुद्धा दचकून जागा होतो मधीच,
तुझी काळजी रात्रभर सतावत राहते उगीच.
तू का इतक्या लवकर सोडून गेलीस गाव माझं,
'आईविना पोर'असं घेतात लोक नाव माझं.
वरवरच्या पदार्थाची मला चवंच लागत नाही,
काय करू, तुझ्या दुधाविना माझी भूकच भागत नाही.
पोरकेपणाचा माझ्याभोवती का ठेऊन गेलीस जाळ,
का खरंच इतकी कच्ची होती तुझ्या माझ्यातली नाळ.
तिथं कुणी आहे का तुझ्याशी बोलायला भरपूर,
उगाच रडत राहू नकोस दाबून स्वतःचा ऊर.
बघं आता आई मी रडत नाही पडलो तरी,
मला ठाऊक आहे तू गेली आहेस देवा घरी.
भूक लागली तरी बिलकुल मी रडत नाही,
कारण मी हसल्याशिवाय तुला चैन पडत नाही.
पण रोज रात्र झाली की तुझ्या आठवणींचा थवा येतो,
अंथरुणात लपून, पुसून डोळे मी गप्प झोपी जातो.
बघं तुझं बाळ किती समजूतदार झालं आहे,
आणि वय कळण्याआधी वेडं वयात आलं आहे.
अजिबात म्हणजे अजिबात त्रास देत नाही पप्पाला,
तुझी काळजी तेवढी मात्र घ्यायला सांग देवबाप्पाला.
आणि सांग की हे शहाणं बाळही आहे जरा हट्टी,
जर का काही झालं तुला तर घेईन म्हणावं कट्टी.
मी आता थकलोय तुला ढगांमध्ये पाहून,
ये आता भेटायला नजर तिथली चुकवून.
जमलं जर का सुट्टी घ्यायला तर ये निघून अशीच,
पोट भरतं गं रोज पण मायेची भूक अजून तशीच...
-तुझाच लाडका.