माघार घेणे हे
मावळ्यांच्या रक्तात नाही
!!
.
लढता लढता हरलो जरी,
हरल्याची मला खंत नाही.
.
लढा माझा गड
किल्ल्या साठी लढाईला माझ्या अंत
नाही,
.
पुन्हा उठेन आणि पुन्हा लढेन. शांत
बसायला आम्ही काही संत
नाही !!
.
मृत्युचे आव्हान पेलुनी, तोच
वारसा आम्हाला दिला।
.
शिवरायांचा "शंभू" छावा,
"हिंदू"
म्हणुनी "अमर" जाहला।।
.
।।जय शिवशंभू||
मी महाराष्ट्र बोलतोय...
शिवछत्रपतींच्या तलवारीच्या प्रत्येक वारातून...
गलबलणाऱ्या सह्याद्री पर्वताच्या सिंहगर्जनेतून.. .
कृष्णा, तापी, गोदावरीच्या खळखळणाऱ्या पाण्यामधून...
शिवनेरी, पन्हाळा आणि प्रतापगडाच्या कडकडणाऱ्या तोफांमधून...
अजिंठा आणि वेरूळच्या भव्य लेण्यांतून...
ज्ञानेश्वर, तुकोबा आणि एकनाथाच्या मधुर वाणीतून...
अतिरेक्यांच्या गोळ्यांचा वर्षाव झेलणाऱ्या मुंबईच्या काळजातून...
अख्खं आयुष्य शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याच्या घामातून...
शेतात आनंदाने डोलणाऱ्या पिकांमधून...
खाशाबा जाधवांच्या आणि सचिनच्या विक्रमांमधून...
माशेलकर आणि विजय भटकर यांच्या संशोधनातून...
माझ्यासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकाच्या रक्तातून...
या भूमीतील गरीबाच्या चटणी आणि भाकरीतून...
आणि या मातीच्या प्रत्येक
कणाकणातून...
छ :- छत्तीस हत्तीचे बळ असणारे,
त्र :- त्रस्त मोगलांना करणारे,
प :- परत न फिरणारे,
ति :- तिन्ही जगात जाणणारे,
... शि :- शिस्तप्रिय,
वा :- वाणिज तेज,
जी :- जीजाऊचे पुत्र,
म :- महाराष्ट्राची शान,
हा :- हार न मानणारे,
रा :- राज्याचे हितचिंतक,
ज :- जनतेचा राजा, म्हणजे,
॥ छत्रपति शिवाजी महाराज ॥
असेल हिम्मत तर आडवा ....!!!!!!
जय भवानी जय शिवाजी
पहिला मराठी बाणा - "मोडेल पण
वाकणार नाही"
आता आमचा मराठी बाणा-"मी वाकणार
तर नाहीच पण मोडणारही नाही "
मराठी म्हणजे..
जिथे वाद नाही .......पण संवाद आहे,
प्रश्न नाही ........ पण उत्तर आहे,
हिंसा नाही ........ पण क्षमा आहे,
हाव नाही ....... पण समाधान आहे,
धमकी नाही ...... पण धमक आहे,
भीती नाही ....... पण आधार आहे,
शंका नाही ......... पण विश्वास आहे,
पैसा नाही ........ पण श्रीमंती आहे,
प्रखर नाही .......पण तेजस्वी आहे.
आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ...
हि जात नाही .... "विचार"आहे.
म्हणून गर्वाने म्हणा ..
"होय मी मराठी असल्याचा गर्व आहे"
मराठयाची तरवार कधीच म्यान होत नाही
धर्मशत्रुच्या शिराची कधीच गय होत नाही. . . . . .
लाख देवू आहूती खातर धर्माभिमाना. . . .
अंगावर याल तर शिंगावर घेवू हाच आमचा बाणा. . . .
रक्तातला लाव्हा आजही उफाळत आहे...!
डोळ्यातला निखारा लालबुंद आहे....!
पोलादी मुठीत हत्तीचे बळ आहे...!
मनातला शिवाजी आजही जिवंत आहे.....!!
जय जिजाऊ..
जय शिवराय..