'प्रेम' हा काही प्रायोजित कार्यक्रम नही की, इच्छेनुसार केले अथवा इच्छा नसली म्हणजे थांबविला. 'प्रेम' मानवी भावना आहे. तिच्यावर कोणाचेही 'राज' चालत नाही. 'प्रेम' हे 'स्टॉप वॉच' तर मुळीच नाही. म्हणजे मर्जी असली की सुरू केलं व मर्जी नसली की बंद. 'प्रेम' तर अमृताचा झरा आहे. तो निरंतर सुरूच रहाणार आहे.
काही मिळवीण्यापेक्षा काही हरविण्याची मजा वेगळीच असते,
बंद डोळ्यांनी कुणाची आठवण करण्याची मजा काही वेगळीच असते,
अश्रु बनतात शब्द
आणी
शब्द बनतात कवीता...
खरच कुणाच्या आठवणीसोबत जगण्याची मजाच वेगळी असते.
एक छोटा मुलगा एका चित्रपटात पाहतो की, त्यातल्या एका लहान मुलाला काही गुंड पळवून नेतात आणि त्याच्या आई-वडिलांना पैसे मागतात. मग आई-वडील पैसे देऊन आपल्या मुलाची सुटका करून घेतात.
हा पण मग अशीच भन्नाट युक्ती वापरुन सायकल मिळवायची असं ठरवतो.
तो शंकराच्या देवळात जातो आणि प्रार्थना करतो, "हे महादेवा, मला एक सायकल दे."
तो १ दिवस वाट पाहतो, पण सायकल काही मिळत नाही. मग दुसर्या दिवशी पुन्हा देवळात जातो.
आता मात्र तो देवळातली गणपतीची मूर्ती उचलून घेऊन घरी येतो.
देवळातून बाहेर पडण्यापूर्वी मात्र तो एक चिठ्ठी शंकराच्या पुढे ठेवून येतो.
ती अशी...
"जर तुला तुझा मुलगा सुरक्षित हवा असेल, तर उद्या सायकल घेऊन देवळाच्या मागे ये."
काट्यांसकट गुलाब
याचसाठी विकत घेतात
कारण हास्य व अश्रूं
प्रेमात एकत्र येतात..!!
जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे,
आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम
करतो तिच्या शेजारी बसने...
आणि, ती व्यक्ती कधीही आपली होणार
नाही याची जाणीव होणे...
एक सुंदर मुलगी प्रोफेसरच्या ऑफिसमध्ये गेली अन म्हणाली,
"मी पास होण्यासाठी काहीही करायला तयार आहे.."
प्रोफेसर : काहीही म्हणजे.. काहीही?
मुलगी : हो.. काहीही..
प्रोफेसर : बघ बरं..!! पुन्हा विचार करून सांग.. काहीही करशील??
मुलगी : हो मी काहीही करायला तयार आहे.. हाच माझा फायनल डिसिजन आहे..
प्रोफेसर : ठीक आहे मग.. "अभ्यास कर"..