मुलगा :- लाईफ पार्टनर बद्दल काय
अपेक्षा आहेत तुझ्या??
मुलगी :- त्याचा मस्त बंगला असावा...
मुलगा :- बर....
मुलगी :- बँक मध्ये खूप पैसे असावेत....
मुलगा :- बर...
मुलगी :- त्याची चार चाकी गाडी असावी..
मुलगा :- बर...
मुलगी :- तो एकटा असावा.... म्हणजे आई, वडील,
भाऊ,बहिण नसावा....
मुलगा :- अजून काही म्याडम...
मुलगी :- मुख्य म्हणजे तो समजूतदार असावा....
मुलगा :- तो समजूतदार असेल, तर तुझ्याशी लग्न
का करेल भिकमांगे...
एक खेकडा समुद्र
किना-यावर फिरताना स्वत:च्या पायांमुळे होणारी नक्षी पहात होता.
तेव्हढ्यात समुद्राच्या लाटेने ती नक्षी पुसली गेली.
ते पाहुन खेकडा लाटेस म्हणाला, "मी तर तुला माझी जवळची मैञिण समजत होतो आणी तरीही तू माझी छान नक्षी पुसून टाकलीस."
त्यावर लाट म्हणाली ," अरे या नक्षीच्या मागावरच मासेमार तुला शोधुन पकडेल म्हणून मी नक्षी पुसली.."
मैञीच नातं हे कल्पना शक्तीच्या बाहेरील नातं आहे.
नात्याला किंमत द्या व नात्यावर मनापासून विश्वास ठेवा.
सासूबाई (नव्या सुनेला): या घरात मी गृहमंत्री आहे. अर्थमंत्रालयही मीच सांभाळते.
तुझे सासरे परराष्ट्र तर तुझा नवरा अन्नपुरवठामंत्री आहे. तुझी नणंद नियोजन मंत्रालय सांभाळते.
तुला कोणतं खातं हवं?
सूनबाई : मी विरोधीपक्षात बसते.
गुन्हा फक्त इतकाचं झाला,
कि मी तुझ्यावर प्रेम केलं..
माझं वेड मन तुझ्यावरचं मेलं..
प्रेम मी करतचं राहिले,तू फक्त व्यस्त
राहिला..
मी मात्र धावतचं राहिले, तू मात्र
पाहतचं राहिला..
आज मी तुझ्यापासून खूप दूर आहे,
तू मात्र तिथेचं राहिलास.
डोळे मिटुन प्रेम करते, ती प्रियासी .....
डोळे मिटल्यासारखे प्रेम करते, ती मैत्रिण ......
डोळे वटारुण प्रेम करते, ती पत्नी ......
आणि
डोळे मिटेपर्यँत प्रेमकरते, ती फक्त आई .....
बंडू : मास्तर , आज मी तुम्हाला प्रश्न विचारणार ?
मास्तर : बर बाळा, विचार .
बंडू : मास्तर ,मला सांगा आपल्या गावात पहिली तंदूर भट्टी कोणत्या धाब्यावर लावली..??
मास्तर: अरे मला कस माहित ? हा काय प्रश्न आहे का ?
बंडू: जर तुम्हाला आपल्या गावातली पहिली तंदूर भट्टी नाही माहित तर मग आम्हाला देशातली पहिली अणुभट्टी कुठे लागली हे का विचारता ....?
मास्तर : अरे गाढवा मी काय दररोज धाब्यावर जात नाही मला कस माहिती ?
बंडू : मग आम्ही काय दररोज अणुभट्टीवर जातो का शेकोटी शेकोटी खेळायला ........