असंख्य विचारांचे काळे ढग
मनात माझ्या गर्दी करू लागलेत...
अश्रूनरुपी थेंबावाटे अलगदते
गालावरून बरसू हि लागलेत...
काळ्या ढगांच सावट ते
अजून दूर काही झाल नाही...
निळ्याशार स्वच्छंदी आकाशाचं
दर्शन काही अजून होत नाही...
वाट पाहतेय मी त्या प्रखर
अशा सूर्य किरणांची अंधारमय मनाला
तेजोमय प्रकाशाने उजळवून देण्याची...!!
एक बाकी एकाकी, एक अंत एकांत ..
एक अडके एकात, एक एकटया जगात ...
एक खिडकी एक वारा, एक चन्द्र एक तारा ...
एक नजर एक वाट, एक एकटा एकटाच......
आले आता एक असे वळण नको असलेलं..
तुझ्या आयुष्यात माझे स्थान ओझरत चाललेलं
विरह, दुख, यातना हेच सोबती सांगाती आपले उरलेले..
एक एक क्षण डोळ्यात दाटून अश्रू बनून गालावर ओघळले..
जगाच्या गर्दीत कुणीतरी आपले वाटावं..
आपले असे कुणी अवचित समोर यावं..
झंकारून तारा मनाच्या आज पावसाने बरसावं..
खरच आज असे कुणी मला हि खास भेटावं..
तु मी सोबत असणे सारे काही विधिलिखित आहे..
रोज त्याच गर्दीत असून एकत्र कालांतराने भेटणे..
जवळ असूनही तू अन मी फक्त दूरवर जगत आहे..
आता प्रारब्धाच्या गोष्टी ह्या कसे, कुठे अन केव्हा समोर येणे..
पाहता क्षणीच एकमेकांचे होऊन जातो कसे..
कदाचित दैवी संकेतच मिळत असतील असे..
खेळ सारा भावनांचा होतो अन ओढ कसली कुणास न दिसे..
नाते जूऴते सहजपणे...
नाते तुटते सहजपणे...
पण, तुटल्यानंतर डोळ्यांतले थेंबही गळतात सहजपणे...
मग आठवणी का जात नाहीत सहजपणे...?
त्या का कोरल्या जातात नकळतपणे....?