Out dated झालंय आयुष्य
स्वप्नही download होत नाही
संवेदनांना'virus'लागलाय
दु:खं send करता येत नाही
जुने पावसाळे उडून गेलेत
delete झालेल्या file सारखे
अन घर आता शांत असतं
range नसलेया mobile सारखे
hang झालेय PC सारखी
मातीची स्थिती वाईट
जाती माती जोडणारी
कुठेच नाही website
एकविसाव्या शतकातली
पीढी भलतीच'cute'
contact list वाढत गेली
संवाद झाले mute
computer च्या chip सारखा
माणूस मनानं खुजा झालाय
अन'mother'नावाचा board,
त्याच्या आयुष्यातून वजा झालाय
floppy Disk Drive मध्ये
आता संस्कारांनाच जागा नाही
अन फाटली मनं सांधणारा
internet वर धागा नाही
विज्ञानाच्या गुलामगिरीत
केवढी मोठी चूक
रक्ताच्या नात्यांनाही
आता लागते facebook...
एकदा फेसबुकची बहिण ट्विटर
रस्त्यावरुन जात होती तेव्हा तेथे
गूगल आला अन तीची छेड
काढायला लागला. हे फेसबुक
कळताचं तो तेथे
आला आणि गूगला मारायला लागला.
त्यांचा मँटर खूप वाढतच गेला. मग
एकमेंकानी मारामारीसाठी मुले
बोलवण्याचे ठरवले.
दोघांनी तुम्हाला फोन करून
बोलावले तर तुम्ही कोणाकडून
जाणार फेसबुकदादा की गूगलभाऊ.
कमेंट करुन सांगा.
एकदा फेसबुकची बहिण ट्विटर
रस्त्यावरुन जात होती तेव्हा तेथे
गूगल आला अन तीची छेड
काढायला लागला. हे फेसबुक
कळताचं तो तेथे
आला आणि गूगला मारायला लागला.
त्यांचा मँटर खूप वाढतच गेला. मग
एकमेंकानी मारामारीसाठी मुले
बोलवण्याचे ठरवले.
दोघांनी तुम्हाला फोन करून
बोलावले तर तुम्ही कोणाकडून
जाणार फेसबुकदादा की गूगलभाऊ.
कमेंट करुन सांगा.
साष्यांग नमस्कार विनंती विशेष
कळविण्यास आपल्याला खुप आंनद होत आहे की
चिरंजीव _FACEBOOK
व
चि.सौ. YAHOO याच्या विवाह सोहळ्याचे आयोजन
फेसबुक कट्टा या पेज वर आयोजीत करण्याचे आयोजीले आहे तरी आपण सर्व फेसबुक कट्टा प्रेमीने आगत्यानी उपसिथ्तीत राहावे ही विनंती
आपल्या वधु वरास आर्शिवाद देण्यासाठी खास करून GOOGAL यांना आमंत्रण देण्यात आले आहे
कार्यँक्रमाचे सुत्रसंचलान ORKUT करणार आहे
फेसबुक प्रतिज्ञा
फेसबुक माझे घर आहे..
सगळे फेसबुक युजर माझे मित्र आहेत..
माझ्या फेसबुक Account वर माझे प्रेम आहे..
माझ्या फेसबुक च्या समृद्ध आणि.?
... विविधतेने नटलेल्या.. Profile
चा मला अभिमान आहे..
त्या Profile ला Like होण्याचीपात्रता..
माझ्या अंगी यावी म्हणून मी चोवीस तास..
Online राहण्याचा प्रयत्न करीन..
मी माझ्या पालकांना, गुरुजनाना
आणि वडीलधा-या माणसांना फेसबुक पासून दूर
ठेवीन..
आणि प्रत्येकाला फ्रेंन्ड Request सेंन्ड
करीन..
माझा फेसबुक, आणि माझे फेसबुक मित्र,
यांच्या फोटो Like करण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे..
त्यांच्या Comments आणि त्यांची Post
ह्यांतच माझे फेसबुक वरील आयुष्य
फेसबुक वरील व्यक्ती तितक्या प्रवूत्ती ..
१. फेसबुक कोंबडा ...: यांना वाटते कि रोज सकाळी , " गुड मोर्निंग " ची पोस्ट टाकावी आणि लोकांना गुड मोर्निंग म्हणायला भाग पाडावे.
२. फेसबुक सिलीब्रीटी : हे फेसबुक ने दिलेली ५००० ची लिमिट पूर्ण वापरतात आणि खूप सारे अनोळखी लोकाना अड्ड करत सुटतात.
३. फेसबुक बाबा : हे फक्त देवाच्या पोस्ट टाकणार आणि प्रवचन करत सुटणार .
4. फेसबुक चोर : हे लोक दुसर्यांचे स्टेटस किवा पोस्ट चोरी करून , पटकन आपल्या नावावर टाकतात.
५ . फेसबुक देवदास : हे लोक नेहमी वेदनामय आणि निराशेच्या पोस्ट आणि कविता टाकतात. आणि आपले दुख जगाला दाखवून लोकांना पण दुखी करतात.
६. फेसबुक न्वूज रीडर : जागत काय चालू , ह्या न्वूज हे त्यांच्या स्टेटस मध्ये टाकून लोकांना न्वूज सांगत सुटतात.
७. फेसबुक टीकाकार : हे स्वता तर कधी पोस्ट करणार नाही, पण दुसर्याच्या चांगल्या पोस्ट जावून टीका करत सुटतात. जसे पोस्ट जुनी आहे, पोस्ट जमली नाही वगैरे वगैरे.
८. फेसबुक विदुषक : हे लोक त्यांच्या आयुष्यात किती पण दुख असले तरी सर्वांना कमेंट आणि पोस्ट मधून हसवत असतात.
९. फेसबुक लाईकर : हे लोक गुपचूप पोस्ट वाचून लाईक करतात. पण कमेंट करायला कधी येत नाही.
१०. फेसबुक कमेंटर : यांना कोणती पण पोस्ट असो पण आपण कमेंट मारली पाहिजे असे वाटत असते. आणि कमेंट मास्तर असतात.
११. फेसबुक विचारक : हे लोक चांगले चागले विचार आपल्या पोस्ट मधून लोकापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतात.
१२. फेसबुक कवी आणि कवियित्री : याना कविता सोडून काहीच जमत नाही. हे कविता टाकून लोकांना बोर करत असतात.
१३. फेसबुक टपोरी : हे लोक फेसबुक वर येतातच मुली पटवायला. दिसली मुलगी कि उठ सुठ फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत असतात. आणि कमेंट करत असतात. आणि मुलींच्या मागे लागतात.
१४. फेसबुक द्वेषी : ह्या लोकांना फेसबुक वर कोणाचीच प्रशंसा करणे जमत नाही. हे फक्त लोकानाचा द्वेष करतात आणि दुसर्या लोकांना त्रास देतात.
१५. फेसबुक च्याटर : यांना फेसबुक वर च्याट शिवाय काहीच सुचत नाही आणि जमत पण नाही,
१६. फेसबुक भिकारी : या लोकांची फ्रेंड रिक्वेस्ट ब्लोक असते म्हणून उठ सुठ मला अड्ड करा म्हणून लोकांना भिक मागत फिरत असतात.
१७ . फेसबुक लिंग परिवर्तक : हे लोक वेगळ्या लिंगाचे प्रोफाईल काढून फिरत असतात. मुल मुलीचे प्रोफाईल काढतात आणि मुली मुलाचे प्रोफाईल काढतात.
१८. फेसबुक खेळाडू : हे लोक दिवसभर फेसबुक वर गेम्स खेळत बसतात.
१९. फेसबुक माकड : हे कमेंट मध्ये काहीच बोलत नाही फक्त हा हा ........ हि हि करत असतात.
२० . फेसबुक कलेक्टर : हे फक्त फेसबुक वर पेज आणि ग्रुप जाईन करतात पण कधी पोस्ट किवा कमेंट करत नाहीत. तर फक्त ग्रुप आणि पेज कलेक्ट करत असतात.