चम्या चे चिंगी बरोबर मजबूत भांडण होते.....
चिंगी:- तू हलकट आहेस, जेव्हा तुला गरज असते तेव्हा तू मला मस्का मारून काम करून घेतोस, आणि मला गरज असेल तेव्हा नेहमी तुझे पैसे संपलेले असतात, गाडी पंक्चर असते... मला तुझ्याशी इथून पुढे कोणतेही नाते ठेवायचे नाही....
चम्या:- असे तू आत्तापर्यंत १०० वेळा म्हणाली आहेस, यंदा तरी नक्की आहे ना हे...... म्हणजे मला दुसरी पोरगी पटवायला.....
चिंगी बेहोश.... चम्या मदहोश......
चम्या :- माझा जन्म अमेरिकेत झाला....
.
.
.
.
.
मित्र :- कोणता भाग???
.
.
.
.
चम्या :- माझे सर्व भाग..... :D :D
रडवणारे खूप भेटतील
हसवणारे कमीच असतात
प्रेम करणारे खूप भेटतील
निभावणारे थोडेच असतात..!!
आयुष्य म्हणजे खेळ नव्हे,
फुकट मिळालेला वेळ नव्हे,
आयुष्य 1 कोडं आहे,
सोडवाल तितक थोडं आहे,
म्हणुन म्हणतेय आयुष्यात येऊन माणसं
मिळवावी, एकमेकांची सुख दु:खे
एकमेकांना कळवावी
नात ते नाही ज्यात Ego & attitude असतो
नात तर ते
असतं ज्यात एक रुसण्यात expert असतो तर
दूसरा
मनवण्यात Perfect असतो...
डोळ्यातून अश्रु ओघळला
की तोही आपला राहत नाही
वाईट याचंच वाटतं की
दु:ख त्याच्या सोबत वाहत नाही।