जाणली तर नाती खोटी नसतात..
मनात असेल तर आपली असतात..
खोटी नाती तर स्वत: कधीच खोटी
नसतात..
माणसेच त्या
नात्यांना खोटे ठरवतात..
शेवटी कोण काही घेऊन जात नसते
जाताना हि चार माणसे पोहोचवायला
लागतात ...
अर्थात:- जाणली आणि मानली तर नाती
नाही तर बरी असते वावरतील माती..
काही नाती तुटत नाहीत,
ती आपल्या नकळत मिटून जातात,
जशी बोटांवर रंग ठेवून
फ़ुलपाख्ररे हातून सुटून जातात...!
असे ह्रदय तयार करा की , त्याला कधी तडा
जाणार नाही ..
असे हास्य तयार करा
की ,
ह्रदयाला ञास होणार
नाही ..
असा स्पर्श करा की ,
त्याने जखम होणार
नाही ..
अशी मैञी करा की ,
त्याचा शेवट कधी
होणार नाही
जीवनामध्ये या 5 गोष्टीँना कधीच तोडु नका.
1) विश्वास
2) वचन
3) नाते
4) मैत्री
5) प्रेम कारण
या गोष्टी तुटल्यावर आवाज होत नाही.
परंतु वेदना खुप होतात.
जेव्हा मनुष्याकडील धन नष्ठ होते,
तेव्हा वास्तविक त्याचे काहीच नष्ठ होत नाही.
जेव्हा मनुष्याचे आरोग्य बिघडते,
तेव्हा त्याचे काहीतरी नष्ठ होते.
परंतु,
जेव्हा मनुष्याचे चारित्र्य बदनाम होते,
तेव्हा त्याचे सर्वस्व नष्ठ होते....
चूक माझी नसतानाही
मी माफी मागायला तयार आहे ...
तुटणारं नातं जपायला
माघार घ्यायला तयार आहे.