बेवडा नवरा अर्ध्या रात्री दारू पिऊन आला आणि दरवाजा खटखटवला.
बायको :-"मी दरवाजा उघडणार नाही, इतक्या रात्री जिकडून आलात तिकडेच चालते व्हा.
नवरा :-"दरवाजा उघड नाही तर समोरील नाल्यात उडी मारून मी माझा जीव देईन "
बायको :-"मला काही फरक पडणार नाही, तुम्हाला जे करायचे ते करा "
यानंतर नवरा गेटजवळील अंधारया भागात जाऊन उभा राहतो आणि दोन 2 मिनिट वाट बघितल्यानंतर एक मोठा दगड उचलतो आणि नाल्यातील पाण्यात फेकतो.
धपाक
बायकोने हे ऐकल्यावर दरावाजा उघडला आणि लगेच नाल्याकडे पळाली.
आंधारात उभ्या असलेल्या नवरयाने दरवाज्याकडे धूम ठोकली व त्याने आतून दरवाजा बंद केला.
बायको :-"दरवाजा उघडा ,नाही तर मी ओरडून ओरडून आख्खी गल्ली जागी करेन "
नवरा :-"जो पर्यंत सारे शेजारी जमा होत नाही तोपर्यंत मोठ्याने ओरड, मग मी त्यांच्यासमोर तुला विचारीन की एवढ्या रात्री नाईट गाऊन मध्ये तू कुठून येते आहेस?
एकदा एक कोंबडी अंड्यांच्या दुकानात जाते...
दुकानदार :- काय ग, तुला अंडी विकत घायची काय गरज आहे?
कोंबडी :- काही नाही, माझा नवरा म्हणतो उगाच ३.५० रुपयासाठी "फिगर" नको बिघडवूस.. :D :D
झम्प्याची बायको मेली..
चम्प्या – यार..खूप वाईट झालं..काय झालं होतं
नेमकं वहिनीला?
झंप्या (रडत) – अरे कोणीतरी बंदुकीने
गोळी मारली कपाळावर..
.
.
.
चम्प्या – अरे यार..देवाचे उपकार
मान..डोळा वाचला थोडक्यात.. :D
७० वर्षाच्या आजोबांनी आपल्या बायको ला विचारलं,
मि जेव्हा तरुण मुलींच्या मागे धावतो तेव्हा तुला वाईट वाटत का ग??
बायको (कुत्सितपणे हसून) : नाही हो, बिलकुल नाही, कुत्रासुद्धा गाडीच्या
मागे धावतो, पण गाडी त्याच्या हाताला लागते का कधी?:-P:-P
पहिला :- अरे मित्र तू तुझ्या गर्लफ्रेंड ला का सोडलास...?
दुसरा :- काय नाय यार, काहीही मागते माझ्याकडून....
पहिला :- म्हणजे नेमक काय मागितल?
दुसरा :- लग्न कर म्हणत होती..... :D :P
दोन म्हातारे मित्र खूप
क्रिकेट वेडे असतात..एक मित्र मरत
असतो तेव्हा दुसरा त्याला सांगतो ...तू मेल्यावर
स्वर्गात क्रिकेट आहे का ते कळव..
काही दिवसांनी मेलेला मित्र दुसर्याच्या स्वप्नात
... ... ... ... आला आणि म्हणाला ...एक चांगली बातमी आहे आणि एक
वाईट ...कोणती आधी सांगू...दुसरा मित्र
म्हणाला चांगली आधी ...मेलेला मित्र
म्हणाला ..आनंदाची गोष्ट म्हणजे स्वर्गात क्रिकेट
आहे...वाईट बातमी म्हणजे ...बुधवारच्या म्याच मध्ये
तुला बोलिंग करायची आहे...........