माझ्यापैक्षा जास्त तूच
रडली होतीस ना आई....
आई थंडी वाजतेय ग,
मायेचे
पांघरूण,आणि त्याची उब...
डोक्यावर थंड
पाण्याच्या पट्ट्या...
केसांवरून फिरणारा तो प्रेमळ
हात...
रात्रभर माझ्यासाठी जागलेले
डोळे....
मी ठीक कसा नाही होणार?
पण मी आजारी पडल्यावर,
माझ्यापैीक्षा जास्त तूच
रडली होतीस ना आई....
"झोप रे बाळा" शांत झोप,
नाही आई माझी परीक्षा आहे!
वर्षभर मी अभ्यास करावा,
म्हणून माझ्यावर ऑरडलिस...
नाही बाळा परीक्षा नंतर
देता येईल...
तू विचार नको करू शांत झोप...
मी परीक्षा देऊ शकलो नाही,
म्हणून माझ्या पैक्शा जास्त तूच
रडली होतीस ना आई.....
खूप दिवस उलटले आहे आता ..
मी शिकून मोठा ही झालोय...
पैसा ,गाडी ,लपटोप सर्व आहे....
पण तू नाहीस.....एकट वाटत ग,
तू माज्या जवळ नाहीस,
म्हणू आता प्रत्येक दिवस माझ
हृदय खूप रडत ग आई.
खूप रडत ग आई.....
आई, किती ते तुझं निस्वा:र्थ प्रेम
हृद्याच्या किती कप्प्यात साठवू मी
कितींदा नव्या हृदयाचा संदेश
देवाकडे क्षणाक्षणाला पाठवू मी
आई, हजार जन्म घेतले तरी
एका जन्माचे ऋण फीटणार नाही
आई, लाख चुका होतील मज कडून
तुझं समजावनं मिटणार नाही
आई, करोडोंन मध्ये जरी हरवलो
तरी तू मला शोधून काढशील
आई, तुला एकदाच हाक दिली
तरी अब्जांनी धावून येशील
पहील्या नजरेतील प्रेमावर,
माझा विश्वास आहे..
कारण ?????
जेव्हा मी पहिल्यादा डोळे उघडले होते,
तेव्हापासुनचं आईच्या प्रेमात आहे..
I Luve U. आई..
आई तुझ्या संस्कारातुन कोवळ्या रोपाचे तरु झालो,
मी कसा गं विसरेन तुला, तुझ्यामुळेच मी महान झालो,
तुझा तो मायेचा पदर, लपवित होता सारे प्रमाद,
तुझ्याविना माझा क्षण, नव्हता गं जात,
कधी तु मारलेस मला, तुझा प्रेमळ करांनी
पण दोष देशी स्वः ताला काहि क्षणांनी,
दुर जाता तुझापासुन, चिंता लागे तुझ्या जिवा
जरी मी मोटा झालो, तरी तुझा मायेचा पदर हवा..
जगात येताना त्रास देऊन येतो आपण
झालेल्या वेदना ती लेकरासाठी सोसते..
ती आई
फुलपाखराला उडायला शिकवते..
ती आई उपाशी राहून प्रेमाचा घास
भरवते..
ती आई बाळ झोपत नाही म्हणून
अंगाई गात जागते..
ती आई आपल्या जखमा पाहून डोळ्यांत
पाणी आणते..
ती आई माझी आई खूप चांगली आहे खरच
भाग्यवान आहे मी मला दिलीस आई..
पण...
दूर आहे मी मला खूप ती आठवते तिचे
नाव घेताच डोळ्यांत पाणी खूप
साठवते..
वेळ ही कशी असते जिला मान्य
नसते नाते दुख खूप आहेत नेहमी तेमलाच
एकट्यात पाडते..
आई तुझी आठवण मला जागवत असते
माहित नाही ग तुला मी भेटेल
पुन्हा कि नाही..
पण....
अखेरचा श्वासात ही फक्त तुझेच नाम
राहील ....
‘आई LoVe YoU...
६ वर्षांचे असताना: आईला सगळं काही माहित आहे.
८ वर्षांचे असताना: आईला बरंच काही माहित आहे.
१२ वर्षांचे असताना: आईला बरंच काही माहित नाही. :(
१४ वर्षांचे असताना: आईला काहीच माहित नाही.
१६ वर्षांचे असताना: काय आई तुला काहीच माहित नाही!!
१८ वर्षांचे असताना: तू किती जुन्या विचारांची आहेस!! :(
२५ वर्षांचे असताना:आईला जरा तरी माहित आहे
३५ वर्षांचे असताना: हे काम करण्याआधी आईला एकदा विचारलं तर बरं होईल!
४५ वर्षांचे असताना: आईला विचारायलाच पाहिजे काय करू ते..
७५ वर्षाचे असताना: आई इथे असती तर खूप बरं झालं असतं..!! :(