आयुष्यात दोन व्यक्तींची खूप काळजी घ्या...
१. तुम्ही जिंकण्यासाठी स्वत: आयुष्यभर हरत राहिले ते - ''बाबा''
२. तुमच्या हरण्याला सतत जिंकणं मानत आली ती - ''आई''
"बाप बाप असतो...
तो काही शाप नसतो....
तो आतून कँनव्हास असतो...
मुलासाठी राब-राब राबतो...
बुडणार्या सुर्याकडे उगाच पाहत बसतो.
पायाच्या नखानी माती उकरत असतो.
शेवटी सर्वानीच साथ सोडली असते.
पाखरं घर सोडून दुर निघुन गेलेली असतात.
बाप मात्र आपल्या पाखराची वाट पाहतो.
प्रिय बाबा, आठवतंय मला,
तुम्ही बोट धरून चालायचं शिकवलेलं,
माझं पहिलं पाऊल धडपडलेलं
तुमच्या काळजाचा ठोका चुकवलेलं,
तुमच प्रेम नेहमीच मिळवलेलं
प्रिय बाबा, आठवतंय मला,
तुम्ही मला लाडाने पिल्लू म्हणलेलं,
आईला देखील दोन शब्द बोललेलं,
लाडाने जवळ घेऊन अ, आ, ई, गिरवलेलं,
खाऊ शिवाय कधी बाहेर न जाऊ दिलेलं,
प्रिय बाबा, आठवतंय मला,
शिक्षणासाठी सर्वस्व डावावर लावलेलं,
कष्टाने मिळेल तेच मिळवलेलं,
तुमच्या संस्कारांनी आयुष्य घडलेलं,
आजही आयुष्य तुमची उणीव भासलेलं,
प्रिय बाबा, आठवतंय मला,
एका लहान मुलाचा वाढदिवस असतो...
तो त्याच्या वडिलांना विचारतो, "बाबा तुम्ही माझ्या वाढदिवसाला असे जुने कपडे का घातले आहेत ??"
तेव्हा त्याचे वडील म्हणाले : "कारण माझ्या कडे तितकेच पैसे आहेत बाला कि मी एका साठीच कपडे घेवू शक्रो...
... आणि आताच्या घडीला माझ्या साठी तुला कपडे मिळण महत्वाचा आहे...."
२० वर्षांचा काळ लोटला आता वडील मुलाला विचारत होते "अरे तू सगळी रक्कम जमा का करत आहेस आणि जुनीच कपडे घालून फिरतोस..."
मुलगा म्हणाला: "बाबा मला एका घर घ्यायचंय त्या मानसासाठी ज्याने मला इतका खालून वर आणलं
त्यांनी मला एक ओळख मिळवून दिली...."
बाप हि निशब्द झाला मनात म्हटला"जीवन सार्थ झाल... आता डोळे मिटलो तरी चिंता नाही...."
मुलगा लगेच म्हणाला"बाबा मला तुमची अजून हि गरज
आहे..."