गरीब माणुस दारु पितो,
मध्यमवर्गीय मद्यपान करतो,
तर श्रीमंत लोक ड्रिंक्स घेतात!
काम केल्यावर गरीब माणसाला मजुरी मिळते,
काम केल्यावर मध्यमवर्गीय गृहस्थाला पगार मिळतो,
तर काम केल्यावर ऑफिसर लोकांना सॅलरी मिळते!
गरीब माणुस करतो ते लफडं,
मध्यमवर्गी य माणुस करतो ते प्रेम,
तर श्रीमंत व्यक्ती करतात ते अफेअर!
शब्दाने शब्द वाढला की कविता होते,
शब्दाने शब्द वाढला की भांडण होते
शब्दाने शब्द वाढला की लेखकाची रॉयल्टी वाढते…
खरी माणसे हि जगातील सर्वात सुंदर मुलीवर प्रेम करत नाही......
ती माणसे,
जी मुलगी त्यांचे जीवन सुंदर बनवते तिच्यावर प्रेम करतात.
प्रत्येक नात्यातले वेगळेपण,
शब्दांत मांडता येत नाही,
मनातल्या भावनांना,
शब्दांचे बांध घालता येत नाही...
आधुनिक युगातल्या म्हणी....
1) राहायला नाही घर म्हणे लग्न कर !!!!!
2) सासु क्लबमध्ये सुन पबमध्ये !!!!!
3) वंशाला हवा दिवा, ह म्हणते ईश्श तिकडे जावा !!!!!
4) खिशात नाही डोनेशन, घ्यायला चालला ऍडमिशन !!!!!
5) मुलं करतात चॅनेल सर्फ़, आईबाप करतात होमवर्क !!!!!
6) चुकली मुलं सायबरकॅफ़ेत !!!!!
7) चुकल्या मुली ब्युटीपार्लरमध्ये !!!!!
8) ज्या गावचे बार, त्याच गावचे हवालदार !!!!!
9) नाजुक मानेला मोबाईलचा आधार !!!!!
10) मनोरंजन नको रिंगटोन आवर !!!!!
11) स्क्रिनपेक्षा एस एम एस मोठा !!!!!
12) जागा लहान फ़र्निचर महान !!!!!
13) उचलला मोबाईल लावला कानाला !!!!!
14) रिकाम्या पेपरला जाहिरातिंचा आधार!!!!!
15) काटकसर करुन जमवलं, इंकम टॅक्समध्ये गमावलं...!!!
शब्दांमुळेच कधी-कधी एखाद्याचा होतो घात,
शब्दांमुळे मिळते एखाद्याची आयुष्यभर साथ.
शब्दांमुळे जुळतात मना-मनाच्या तारा,
शब्दांमुळेच चढतो एखाद्याचा पारा,
शब्दच जपुन ठेवतात त्या गोड आठवणी,
शब्दांमुळे तरळते कधीतरी डोळ्यात पाणी !
मुलीँचे हसणे हे मुलाच्या हसण्यापेक्षा ही,
खुप सुंदर आणि लुभावने असते..
पण ?????
मुलांचे रडणे हे
मुलींच्या रडण्यापेक्षा ही,
खुप भावनिक आणि अर्थपुर्ण असते...!!!..