आठवण आली तुझी की.., नकळत डोळ्यांत पाणी येतं..
मग आठवतात ते दिवस जिथं आपली ओळख झाली..
आठवण आली तुझी की.., माझं मन कासाविस होतं..
मग त्याच आठवणीना.. मनात घोळवावं लागतं..
आठवण आली तुझी की.., वाटतं एकदाच तुला पाहावं..
अन माझ्या ह्रदयात सामावुनघ्यावं..
पण सलतं मनात ते दुःख..
जाणवतं आहे ते अशक्य…कारण देवानेच नेलयं माझं ते सौख्य…
पण तरि ही……आठवण आली तुझी की,
देवालाच मागते मी….
नाही जमलं जे या जन्मी..
मिळू देत ते पुढच्या जन्मी ..
आयुष्यातील सर्वात वाईट गोष्ट म्हणजे जिव्हाळा (an
attachment )
अतिशय दुःख होते जेव्हा आपण तो घालवून बसतो......
सर्व काही असून नसल्यासारखे वाटते.....
आणि आयुष्यातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे एकटेपणा (a
lonliness )
कारण ह्यातून खूप काही आपल्याला शिकायला मिळतं
आणि जेव्हा आपण तो घालवून बसतो आपल्याला सर्व
काही मिळतं....
पाने आयुष्याची थोडी चाळून पाहिली
चाळताना जीवाची झाली होती काहिली
पूर्ण आयुष्याची आठवण मी क्षण क्षण जपली
तरी पण ह्या माझ्या छोट्या विश्वात फक्त तुझीच कमी राहिली
ढग येतात पण पाऊस पडत नाही,
आठवणी येतात पण चेहरा दिसत नाही,
काय मी बोलू तुला पुढे गाय मागे वासरू,
संग प्रिये मी तुला कसे विसरू.....
वेड लागले आहे तुझ्या भेटीचे..
तुझ्या स्पर्शानी दरवळणार्या सांजेचे..
आसुसलेलं एकटे मन फक्त उराशी..
हल्ली खूप दूर तू अन आठवण तरंगते डोळ्याशी..
आज मला खूप एकट वाटतय...,
कुणाच्या तरी जवळ बसावस वाटतय...,
कोणाशी तरी खूप खूप बोलावस वाटतय...,
अन मनात चाललेल सगळ काही सांगावस वाटतय....
आज परत एकदा त्याला पहावस वाटतय...,
त्या प्रेमाच्या आठवणीना....., परत जगवावस वाटतय...,
त्याचा हात परत माझ्या हातात घेऊन...,
थोडा चालावस वाटतय....
आज मला खूप खूप रडावस वाटतय....,
स्वतःशी परत खूप भांडावस वाटतय....,
भरलेल्या डोळ्याने...., आरश्या समोर बसावस वाटतय....,
अन आपलं कोणीच नाही..., म्हणून...,
स्वतःचेच डोळे पुसावंस वाटतय...
आज मला परत भूतकाळात जावस वाटतय....
परत एकदा..., त्याच्याच आठवणींत जगावस वाटतय....
फक्त त्याच्याच आठवणींत........ i MiSS U...!