सासूबाई (नव्या सुनेला): या घरात मी गृहमंत्री आहे. अर्थमंत्रालयही मीच सांभाळते.
तुझे सासरे परराष्ट्र तर तुझा नवरा अन्नपुरवठामंत्री आहे. तुझी नणंद नियोजन मंत्रालय सांभाळते.
तुला कोणतं खातं हवं?
सूनबाई : मी विरोधीपक्षात बसते.
बंडू : मास्तर , आज मी तुम्हाला प्रश्न विचारणार ?
मास्तर : बर बाळा, विचार .
बंडू : मास्तर ,मला सांगा आपल्या गावात पहिली तंदूर भट्टी कोणत्या धाब्यावर लावली..??
मास्तर: अरे मला कस माहित ? हा काय प्रश्न आहे का ?
बंडू: जर तुम्हाला आपल्या गावातली पहिली तंदूर भट्टी नाही माहित तर मग आम्हाला देशातली पहिली अणुभट्टी कुठे लागली हे का विचारता ....?
मास्तर : अरे गाढवा मी काय दररोज धाब्यावर जात नाही मला कस माहिती ?
बंडू : मग आम्ही काय दररोज अणुभट्टीवर जातो का शेकोटी शेकोटी खेळायला ........
एक छोटा मुलगा एका चित्रपटात पाहतो की, त्यातल्या एका लहान मुलाला काही गुंड पळवून नेतात आणि त्याच्या आई-वडिलांना पैसे मागतात. मग आई-वडील पैसे देऊन आपल्या मुलाची सुटका करून घेतात.
हा पण मग अशीच भन्नाट युक्ती वापरुन सायकल मिळवायची असं ठरवतो.
तो शंकराच्या देवळात जातो आणि प्रार्थना करतो, "हे महादेवा, मला एक सायकल दे."
तो १ दिवस वाट पाहतो, पण सायकल काही मिळत नाही. मग दुसर्या दिवशी पुन्हा देवळात जातो.
आता मात्र तो देवळातली गणपतीची मूर्ती उचलून घेऊन घरी येतो.
देवळातून बाहेर पडण्यापूर्वी मात्र तो एक चिठ्ठी शंकराच्या पुढे ठेवून येतो.
ती अशी...
"जर तुला तुझा मुलगा सुरक्षित हवा असेल, तर उद्या सायकल घेऊन देवळाच्या मागे ये."
एक सुंदर मुलगी प्रोफेसरच्या ऑफिसमध्ये गेली अन म्हणाली,
"मी पास होण्यासाठी काहीही करायला तयार आहे.."
प्रोफेसर : काहीही म्हणजे.. काहीही?
मुलगी : हो.. काहीही..
प्रोफेसर : बघ बरं..!! पुन्हा विचार करून सांग.. काहीही करशील??
मुलगी : हो मी काहीही करायला तयार आहे.. हाच माझा फायनल डिसिजन आहे..
प्रोफेसर : ठीक आहे मग.. "अभ्यास कर"..
शिक्षक: वर्गात एवढा गोंधळ का चालू आहे?
.
.
.
.
.
.
.
.
विद्यार्थी आम्ही संसद संसद खेळतोय सर
Bullet वाला मुलगा Activa वाल्या मुलीला ओवरटेक करतो आणि विचारतो ...
कधी बुलेट चालवली आहेस का ?
मुलगी जोरात गाडी चालवते आणि समोर निघून जाते...
मुलगा पुन्हा बरोबरित येऊन - कधी बुलेट चालवली आहेस का ?
मुलगी ब्रेक मारते आणि मुलाचा पुढे जाऊन आक्सिडेंट होतो..
मुलगी - नालायक मूर्ख.... गाडी नीट चालवता येत नाही का तुला ??
मुलगा - अग बावळट , तुला तेच विचारत होतो की बुलेट चालवली असेल तर लवकर सांग ब्रेक कुठे असतो? :P :P