Mobile Sms, Status Updates and images. Hindi, Marathi, Punjabi and English messages.

Poem Marathi Status & Poem Marathi Sms


मी "बाबासाहेबांवर" कविता लिहिली
लाेकांनी मला फोन करून विचारले
"तुम्ही बौध्द किंवा दलित आहे का?"

मी "छत्रपतींवर" कविता लिहिली
लाेकांनी मला फोन करून विचारले
"तुम्ही मराठा आहे का?"

मी "फुल्यांवर" कविता लिहिली
लाेकांनी मला फोन करून विचारले
"तुम्ही माळी आहे का?"

मीअहिल्या देवींवर कविता लिहीली
लाेकांचा मला फोन आला
अन विचारले
"तुम्ही धनगर अहात का"

मी "माणसावर" कविता लिहिली
मला फोनच आला नाही.....

वाट पाहतोय.......
“ती"माणसे गेली कुठे

माणसाने माणुस मारून
फ़क्त आणि फ़क्त
जात जिवंत ठेवली आहे..

Categories : Nice   Poem  


प्रेमाला प्रेम समजणारी ती प्रेयसी आहे माझी
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम
करणारी...
.
खुबसुरत नसलो तरी,
चारचौघात मला शोभूनदिसणारी
.
शेर -ए-गझल नसली तरी,
माझी एक छानशी चारोळी आहे
.
बागेतल्या फुलांसारखी सुंदर
नसली तरी,
पण
अंगणातल्या तुळसेसारखी पवित्र
आहे
.
हाय...हेलो...नया दौर असला तरी
नव्या जुन्याची सांगड घालणारी
.
पण मनाने सुंदर आहे
नात्यांच्या नाजुक
धाग्यांना हळुवार जपणारी
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम
करणारी..
.
अशी आहे माझी प्रेयसी..

Category : Poem


वेडं मन...
समजावु कसं वेड्या मना?
ओढ तुझ्याकडेच घेतंय ते.
तू बरोबर नसल्यावर,
तुझ्याकडेच खेचून नेतंय ते...
तुझ्या डोळ्यांच्या निळाईत
माझं मन जातंय बुडून,
अर्थात, माझं तरी कुठे उरलंय ते
सारखं तुझ्याकडेच बसतं दडून...
मनात भरुन राहिल्येस तूच
त्यात आणखी काय साठवशील?
माझ्या मनाला थोडा वेळ तरी,
माझ्याकडे पाठवशील?

Category : Poem


मनात खुप काही असत
सांगण्यासारख पण...

काही वेळा शांत बसणच
बर असतं...

आपल दुःख मनात ठेवुन अश्रु
लपवण्यातच आपल भल असतं...

एकांतात रङलं तरी चालेल
लोकांमध्ये मात्र हसावच लागतं...

जीवन हे असच असत ते आपल असल
तरी इतरांसाठी जगावच लागतं....

Category : Poem


मागून प्रेम कधी मिळत नाही
ते समोरच्याच्या मनात असाव लागत

आणि समोरच्याच्या मनात रुजायला
ते देवाला मान्य असाव लागत

खरे प्रेम कधी कोणाकडून मागावे लागत नाही
ते शेवटी आपल्या नशिबात असाव लागत..

Categories : Love   Poem  


या पोरी म्हणजे पोरीच असतात,
कधी गोड बुंदी कधी तिखट कचोरी असतात...

जाणून घ्यायला थोड्या कठीणच असतात
सुंदर दिसणाऱ्या आपल्या नशिबात नसतात...

ज्यांना आपल्यात इंटरेस्ट अश्या थोड्या कमीच असतात,
आपल्याला आवडणाऱ्या सहसा आधीच एंगेज असतात...

नखरे ह्यांचे तसे खूप असतात,
पक पक पक पक यांच्या तोंडाला टाळे नसतात,
आमच्या मनात टपरीवरची रु.५ ची कटिंग,
त्या मनात कॅफे डे ची रु.२५ ची कॉफी घेऊन असतात...

सांभाळतात आम्हाला म्हणून
त्यांना गुन्हे सगळे माफ असतात,
पण काही हि म्हणा....या पोरी एकदम भारी हसतात...
घायाळ करतात....परवानगी न घेता एकदम मनात बसतात..

Category : Poem

 Prev 123Next
Marathi Sms & Status
Marathi Facebook Pics
 • Attitude
 • Boys
 • Facebook
 • Family Mother
 • Family - Father
 • Friends
 • Funny
 • Good-Morning
 • Good-Night
 • Joke
 • Life
 • Love
 • Me Marathi
 • Miss You
 • Motivational
 • Nice
 • Sad
 • Wise
FB Page