Mobile Sms, Status Updates and images. Hindi, Marathi, Punjabi and English messages.

Mother Marathi Status & Mother Marathi Sms


आई : बेटा, माझे डोळे खराब झाले तर तू काय करशील ???
मुलगा : मी तुला सर्वात चांगल्या डॉक्टर कडे घेऊन जाईल.....
आई : तरीदेखील डोळे ठीक नाही झाले तर....????
मुलगा : मी खूप पैसे जमा करेल आणि विदेशात घेऊन जाईल
ऑपरेशन साठी....
मुलगा : ....आई जर माझे डोळे खराब झाले तर तू काय
करशील ?
आई हसत हसत म्हणते,"बेटा, मी तुला माझे डोळे देईल"
कोणीही आई च्या प्रेमाची बरोबरी नाही करू शकत



आयुष्यात दोन व्यक्तींची खूप काळजी घ्या...
१. तुम्ही जिंकण्यासाठी स्वत: आयुष्यभर हरत राहिले ते - ''बाबा''
२. तुमच्या हरण्याला सतत जिंकणं मानत आली ती - ''आई''



आई तुझ्या कुशीत
आई तुझ्या कुशीत, पून्हा यावेसे वाटते
निर्दयी या जगापासुन, दुर जावेसे वाटते ॥
कोणी न येथे कुणाचा, सारीच नाती खोटी
तुझ्याशीच फक्त आता, नाते जपावेसे वाटते ॥
... कोळून प्यायलो मी, सुख दुःख सारे
माते तुझ्या विरहास, न प्यावेसे वाटते ॥
कित्येक रात्री, ऐश्वर्यात लोळलो मी
अखेरच्या क्षणाला, तुझ्या कुशीत निजावेसे वाटते ॥
दगडातला तो देवही,आता नवसाविना पावेना
निस्वार्थ हृदय माऊली, तुलाच पूजावेसे वाटते ॥
असेन जर मजला, मानव जन्म कधी
आई तुझ्याच पोटी, पून्हा जन्मावेसे वाटते ॥

Category : Mother


आई बद्दल सगळेच लिहितात पण
बापाबद्दल कोणीच नाही...
"आपला मुलगा/मुलगी पास
झाल्यावरअगदी आनंदी होऊन
आपल्या पाल्याबाबत
सगळ्यांना सांगणारीआई
सगळ्यांना दिसते...
पण मागून हळूच मिठाइच्या दुकानात
जाऊन पेढ्यांचा box आणणारा बाप
कोणालाच दिसत नाही...
पायाला कुठे छोटीसी ठेस लागली तर
तोंडातून लगेच निघतं...आई गं... पण तेच
एखादा truck समोर आला तर...बाप रे..."
आई सौम्य असते...ती आपल्या भावना व्यक्त
करते... बाप कठोर असतो...किंबहुना
ह्या धकाधकीच्याजीवनात
जगतांना त्याला कठोर व्हावंच लागतं...
पण मनात वादळ उठलेलं
असतांना चेहऱ्यावर काहीच झालेलं
नाही हेदाखवण्यासाठी खूप सामर्थ्य
लागतं...आणि ते बापामधेच असतं

Category : Mother


आपण जसे जसे मोठे होतो तेव्हा आपण कसा विचार करतो..

६ वर्षांचे असताना :आई ला सगळ
काही माहित आहे

८ वर्षांचे असतातन:आई ला बराच काही माहित आहे

१२ वर्षांचे असताना:आई
ला बराच काही माहित नाही :(

१४ वर्षाचे
असताना:आईला काहीच माहित नाही

१६:काय आई तूला काहीच
माहित नाही

१८ वर्षांचे
असताना:किती जुन्याविचारणाची आहे...:((

२५ वर्षांचे असताना:आई
ला जरा तरी माहित आहे....

३५ वर्षांचे असताना:हे काम
करण्या आधी आई ला एकदा विचारला तर बर
होईल

४५ वर्षांचे असताना:
आईला विचारलाच पाहिजे काय करू ते..

७५ वर्षाचे असताना:आई इथे
असती तर खूप बर झाला असत...

Category : Mother


एक ५ वर्षांची निरागस मुलगी एका औषध विक्रेत्याकडे जाते,

आणि त्याला विचारते " माझ्याकडे हे काही मी दररोज जमा केलेले पैसे आहेत त्या बदल्यात मला दैवी चमत्कार विकत पाहिजे "

.
.

औषध विक्रेता गोंधळाला...

त्याने त्या निरागस मुलीला विचारलं "तुला दैवी चमत्कार का हवाय ?

मुलगी :- डॉक्टर म्हणतात की फक्त माझ्या आईला झालेल्या दुर्दम्य आजारातून फक्त " दैवी चमत्कारच " जीवन दान देऊ शकतो ....

Categories : Nice   Mother  

Marathi Sms & Status
Marathi Facebook Pics
  • Attitude
  • Boys
  • Facebook
  • Family Mother
  • Family - Father
  • Friends
  • Funny
  • Good-Morning
  • Good-Night
  • Joke
  • Life
  • Love
  • Me Marathi
  • Miss You
  • Motivational
  • Nice
  • Sad
  • Wise
FB Page