Mobile Sms, Status Updates and images. Hindi, Marathi, Punjabi and English messages.

Diwali Marathi Status & Diwali Marathi Sms


यशाची रोशनी, समाधानाचा फराळ, मंगलमय
रांगोळी, मधुर मिठाई, आकर्षक आकाशकंदिल, आकाश उजळवणारे फटाके!!

येत्या दिवाळीत, हे सगळं तुमच्यासाठी !! दिवाळीनिमित्त सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा !!

Category : Diwali-Marathi


आनंदाची मुक्तहस्तपणे
उधळण करते ही दिवाळी
.
आप्तजणांच्या गाठीभेटी
घडवून आणते ही दिवाळी
.
सर्वाना एकत्र जमवून
प्रेम वाढवते ही दिवाळी
.
ईवल्या ईवल्या पणत्यांनी
उजळून टाकते ही दिवाळी
.
सुंदर सुंदर आकाशदिव्यानी
प्रकाशमय करते ही दिवाळी
.
लहानांसाठी मजाच मजा
घेऊन येते ही दिवाळी
.
खमंग फराळाचा आस्वाद
घ्यायला देते ही दिवाळी
.
भेटवस्तू आणि भेटकार्डांची
देवाणघेवाण घडवते ही दिवाळी
.
अशी सर्वांचा आनंद
द्विगुणीत करते ही दिवाळी
.
तेव्हा माझ्याकडून सुद्धा सर्वांना
.
दिपावलीच्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा :)

Category : Diwali-Marathi


या दिवाळीत बाजारात आलेलेनवीन फटाके... ;)
१) आन्नारीया : हा फटाका सुरुवातीला सुर्रर्र्र्र असा आवाज करत रोषणाई करतो नंतर एकदम शांत ... वाटते सगळा अंधार संपला आता...नंतर लक्षात येते अंधार तसाच कायम आहे
२) केजरबाण : अतिशय डेंजर फटाका ...काडी लावून लगेच लांब पळावे....काडी लागायच्या आधीच जोरदार आवाज करत आकाशात जातो....मोठ्ठा आवाज करतो...आणि धप्पकन खाली
येतो...
३) ममता लवंगी माळ : ही छोट्या लवंगी फटाक्याची माळ....ही बारक्या पोरांची फटाकडी म्हणून लोक लावतात.....आणि हिची तड तड थांबतच नाही.....
४) मनमोहन ज्योती : हा एक शांत फटाका .....हा पेटवला कि नुसता प्रकाश देतो आवाज अजिबात नाही.. :))
५) शरद डबल फटाका : हा दोन आवाजाचा फटाका आहे..पेटवला कि एक आवाज आपल्याजवळ होतो आणि दुसरा दिल्लीत....
६) अजित साप गोळी : याला फटाका का म्हणावे हेच कळत नाही ...पेटवले कि वरती नुसता काळा धूर आणि खाली सापासारखे वेटोळे काढत राख राहते ....
७) गडकरी चक्र : हे गोल चक्र कधी कुठे सरकेल सांगता येत नाही...सावध असा.... :)))
८) दिग्विज्योत : हा फटाका नको तेव्हा फुटतो आणि सारखा नकोनकोसे आवाज करतो,
लोकप्रिय नसूनही अजून बाजारात ह्याचे अस्तित्व जाणवते हेच आश्चर्य .
९) कलमाडी कलर : हा फटाका फक्त क्रीडा स्पर्धेपुरता वापरतात. याची किंमत करोड रुपये सांगितली जाते पण रंग आणि आवाज दहा रुपयाचा काढतो, नाकापेक्षा मोती जड असे याचे स्वरूप आहे. हा फटाका विकत घेणे म्हणजे आतबट्ट्याचा व्यवहार. वापरणा-याचे पूर्ण दिवाळेकाढतो.
१०) रामदेव रॉकेट : ह्याची करामत पाहायला लोक पहाटे पहाटे मैदानात येतात. कुठल्याही कोनातून वळणारा, संपूर्ण स्वदेशी बनावटीचा, आरोग्यास लाभदायक आणि दुष्ट प्रवृत्तीस मारक असा फटकाआहे.
११) जयललिता चिडी : अत्यंत बेभरवश्याचा आणि लावना-याच्याच अंगावर येणारा हाफटाका आहे. शक्यतो वापर टाळावा.
१२) मोदी माळ : लावल्यावर भगव्या रंगाचा धूर येतो, आजूबाजूचे हिरव्या रंगाचे शेवाळ जाळून टाकते, लावणा-याचा पैसा वसूल आणि पूर्ण विश्वसनीय.
१३) राज रांगोळी : फक्त मराठी माणसासाठी वाजणारा हा फटाका ''खळ्ळ खट्याक'' असा आवाज काढतो, आणि बाहेरच्यांची दातखीळ बसवतो.
१४) सनी लिओन सुरसुरी : हा फटाका परदेशी आहे, लावल्यावर अंगाशी येतो आणि तऱ्हे-तऱ्हेचे खेळ दाखवतो, खूप महाग असून फक्त महेश भटला परवडतो.



दिवाळी अशी खास
तिच्यात लक्ष्मीचा निवास
फराळाचा सुगंधी वास
दिव्यांची आरास मनाचा वाढवी उल्हास
अशा दिवाळीच्या शुभेच्छा तुमच्यासाठी खास !!
ही दिवाळी तुम्हां सर्वांना सुख-समाधानाची, समृद्धीची, भरभराटीची आणि आनंदाची जावो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.....!!!!

Category : Diwali-Marathi


दिवाळीची आली पहाट, रांगोळ्यांचा केला थाट,
अभ्यंगाला मांडले पाट, उटणी, अत्तरे घमघमाट,
लाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट,
पणत्या दारांत एकशेसाठ, आकाश दिव्यांची झगमगाट!
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

Category : Diwali-Marathi


तेजोमय झाला आजचा प्रकाश,
जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Category : Diwali-Marathi

 Prev 12Next
Marathi Sms & Status
Marathi Facebook Pics
  • Attitude
  • Boys
  • Facebook
  • Family Mother
  • Family - Father
  • Friends
  • Funny
  • Good-Morning
  • Good-Night
  • Joke
  • Life
  • Love
  • Me Marathi
  • Miss You
  • Motivational
  • Nice
  • Sad
  • Wise
FB Page